खूप काही

IPL 2021 च्या शेड्युलवर प्रश्नचिन्ह; शेवटच्या IPL मध्ये धोनीवर अन्याय…

बीसीसीआयने रविवारी आयपीएल 2021च्या सामान्यांचे वेळापत्रक जाहीर केले. आयपीएलचा हा14 सत्र 9 एप्रिला सुरू होऊन अंतिम सामना 30 मे रोजी खेळला जाणार. यावेळच्या आयपीएल शेड्यूलमधील खास बाब म्हणजे, कोणतीही टीम स्वतःच्या घरच्या मैदानावर सामना खेळणार नाही. कोरोनामुळे या वेळीचे सामने फक्त चार ठिकाणी खेळले जानार आहे.

या आयपीएल लीगमधील फेरीत सर्व मिळून 56 सामने होणार आहेत. यामध्ये प्रत्येक संघ आपले चार सामने फक्त मैदानावर खेळनार. चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगलुरू या लीग टप्प्यातील १०-१० सामन्याची तयारी करतील तर दिल्ली आणि अहमदाबाद 8-8 सामने.

या वेळी सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जच्या होम ग्राऊंडवरती कोणताही सामना खेळला जाणार नाही. संपूर्ण स्पर्धा केवळ सहा स्टेडियममध्ये खेळण्याच्या कल्पनेविरूद्ध तिन्ही संघांनी त्यांचा निषेध नोंदविला आहे.

संघांना नवीन वेळापत्रक आवडले नाही:
अशा स्थितीत एका फ्रँचायझी अधिका्याने क्रिकबझला सांगितले की, ‘असे वेळापत्रक बनवून तुम्ही एमएस धोनीला त्याच्या शेवटच्या आयपीएलमध्ये चेन्नईत खेळण्यापासून रोखत आहात. प्रेक्षक येणार नसतील तर चेन्नई आणि मुंबई इंडियन्सच्या त्यांच्या घरामधे त्यांना खेळण्यापासून रोखण्यामागील कारण काय? ते पुढे म्हणाले, ‘दिल्लीत पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर असे खेळाडू आहेत जे मुंबईसाठी घरगुती क्रिकेट खेळले आहेत आणि तेथे सुरुवातीच्या तीन सामन्यांसाठी हा संघ खेळला आहे.

त्याचप्रमाणे, पंजाब संघात केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि कोच अनिल कुंबळे या तिघांनाही बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरुवातीचे पाच खेळ खेळावे लागतील.अशा परिस्थितीत बीसीसीआय च्या योजनेला कोणताही अर्थ नाही.

बायो बबल बद्दल प्रश्न :
टीम मधील बायो बबलबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत . ते म्हणाले की या संघांना चार शहरांमध्ये प्रवास करावा लागणार असून यामुळे कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो . संघांना विमानतळ, हॉटेल आणि बसेसमध्ये प्रवास करावा लागेल.

सर्व सुरक्षा असूनही कोरोनाचा धोका कायम असेल. हा प्रश्न खासकरुन मुंबईतील सामन्यांसाठी आहे जिथे सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका जास्त प्रमाणात आहे. धोका असूनही, महाराष्ट्र सरकारने सामन्यांच्या यशस्वी आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments