खूप काही

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत मोठा फरक, कच्च्या तेलाचे भाव वाढले…

देश पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने स्थानिक पातळीवर पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत मोठा फरक दिसण्याची शक्यता आहे.

देश पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने स्थानिक पातळीवर पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत मोठा फरक दिसण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाची किंमत 65 डॉलर प्रतिबॅरल झाल्याने अनेक ठिकाणी चिंता व्यक्त केली जात आहे. असं असलं तरी अनेक पेट्रोल डिझेलच्या कंपन्यांनी आपल्या किंमतीत कोणतीही वाढ केली नाही. (Big difference in petrol and diesel prices)

कच्च्या तेलांच्या किंमतीत उतार-चढाव असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होत असल्याचे दिसून येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलांची प्रतिबॅरल 65 डॉलर किंमत होती, तर गेल्या आठवड्यात प्रतिबॅरल 70 डॉलर किंमत होती. त्या त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती प्रतिबॅरल 61 डॉलर होती.

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणाऱ्या बदलांमुळे नागरिक हैरान झाल्याचे चित्र आहे. दिल्लीसह मुंबईतही पेट्रोलच्या किंमती आठवड्याच्या सुरुवातीला स्थिर असल्याचे समजले जाते.

  • दिल्लीत 29 मार्च रोजी पेट्रोलची किंमत 90.78 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत 81.10 रुपये प्रतिलीटर इतकी आहे.
  • मुंबईत 29 मार्च रोजी पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 97.19 रुपये तर डिझेलची किंमत 88.20 रुपये प्रतिलीटर इतकी आहे.
  • कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलीटर 90.98 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 83.98 रुपयांवर स्थिर आहेत.

    देशातल्या इतर शहरांच्या किंमतीत तुलना केल्यास मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीच सर्वाधिक उच्चांक असल्याचे दिसून येत आहे, मात्र या दरांना केंद्र सरकार जबाबदार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. (Rising crude oil prices at the country level)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments