आपलं शहर

नियम सर्वांसाठी समान! बृहन्मुंबई महानगरपालिकेने या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करून दिले याचे प्रमाण

महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा उद्रेक पुन्हा वाढताना दिसत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार नवीन योजना आखत आहे. परंतु तरीही काही निष्काळजी मंडळी स्वैराचारी वागत आहेत. अशाच एका निष्काळजी बॉलीवुड अभिनेत्री विरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिके द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (The BMC filed complaint against bollywood actress for not following covid guidelines)

कोरोना संक्रमण वाढत असताना केलेल्याकेलेल्या निष्काळजीपणा च्या वर्तणुकीचा जवाब बृहन्मुंबई महानगरपालिकेने विचारला आहे.
या अभिनेत्री चा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्या नंतर ही नियमांचे पालन न केल्याने संबंधित अभिनेत्री वर बृहन्मुंबई महानगरपालिकेने ही कठोर कारवाई करत नियम हे सर्वांसाठी समान असल्याचा पुरावा दिला आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोना चे वाढते थैमान थांबण्यासाठी सरकार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी ‘, ‘माझा मास्क,माझी सुरक्षा ‘असे अनेक उपक्रम राबवत आहे. विविध जाहिरातीतून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
तरीही समाजातील असे काही शिकलेले अशिक्षित कोरोना साखळी तोडण्याच्या कार्यात अडथळा बनतात आणि अशा महाभागांना कायद्याचा बडगा दाखवण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.  ज्याचे लोकांकडून कौतुक होत आहे.  सोबतच मुंबईकरांनो सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा असा संदेश ही मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments