खूप काही

पूर्णतः खाजगी होणार देशातील ही चार मुख्य विमानतळं, मुंबई विमानातळाचा सुद्धा समावेश

केंद्रसरकार दिल्ली, मुंबई, बेंगळूरु आणि हैदराबाद विमानतळ येथील आपली उर्वरित भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे.  सरकारने ही भागीदारी विकून 2.5 लाख करोड़ रुपये जमा करण्याचे नियोजन केले आहे. वास्तविक पाहता या विमानतळांचे खासगीकरण याआधीच झाले आले परंतु विमान पत्तन प्राधिकरण (AAI) अंतर्गत केंद्र सरकार अजूनही काही अंशी याचे भागीदार आहे. (Central government has decided to sell it shares of airports)

13 अन्य विमानतळांच्या खासगीकरणाची तयारी:
गेल्या महिन्यात सचिवांच्या समिती मध्ये या गोष्टीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेतील उपस्थितांनी सरकार या चार विमानतळांच्या भागीदारी सोबतच अन्य 13 विमानतळांच्या खाजगी कारणाचा विचार ही निश्चित झाला आहे. या प्रस्तावाला काही दिवसातच मंजूरीसाठी मंत्रिमंडळात पाठविण्यात येणार आहे.

खाजगीकरण करण्यात येणार्‍या या विमानतळांचा प्रस्ताव अधिक आकर्षित बनवण्यासाठी नफा आणि गैर नफा देणार्‍या विमानतळांचा यात एकत्रित समावेश करण्यात येणार आहे.
अडानी समूहाकडे आहेत ही विमानतळ:
मोदी सरकारद्वारे विमानतळांचे खाजगीकरण करण्याच्या पहिल्या टप्प्यात अडानी समूहाने सहा विमानतळ, ‘लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, मेंगलुरु, तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी’ आपल्या नावे केली आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments