खूप काही

COVID-19 Vaccination: आता तुमच्या सवडीने करता येणार लसीकरण; केंद्र सरकारची मोठी घोषणा

भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहिम यशस्वीपणे राबविली जात आहे. 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांसाठी एक महत्तवपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

“लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सरकारने वेळ मर्यादा संपविली आहे. देशातील नागरिक आता 24×7 स्वत:च्या सवडीने लसीकरण करून घेऊ शकणार आहेत,” असे ट्विट केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी केले आहे.

दुसर्या टप्प्यात 10 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने आजपासून काही खासगी रुग्णालयांनाही कोरोना लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयानुसार आतापर्यंत देशातील 1,56,20,749 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments