खूप काही

Chanakya Niti: चाणक्य यांच्या या गोष्टींना विद्यार्थ्यांनी जाणून घ्या, आयुष्यात सफलता मिळेल.

Chanakya Niti: चाणक्य यांच्या या गोष्टींना विद्यार्थांनी जाणून घ्या, आयुष्यात सफलता मिळेल.

Chanakya Niti Marathi: चाणक्य ( Chanakya) स्वतः एक योग्य शिक्षक होते. चाणक्यचा संबंध विश्व प्रसिद्ध तक्षशिला विश्व विद्यालयशी होता. चाणक्यने याच विद्यायलयामध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर तिथेच शिक्षक झाले.चाणक्याच्या जीवनाचा एक मोठा भाग अध्यापनात( education) गेला. चाणक्य यांनी विद्यार्थ्यांसाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहित असल्या पाहिजेत.

चाणक्य यांच्यानुसार विद्यार्थीआयुष्य खूप महत्त्वाच असतं.भविष्यातील दिशा आणि स्थिती विद्यार्थ्याच्या आयुष्यात निश्चित केली जाते.चाणक्य यांच्यानुसार जसं एक साधू आपली साधना पूर्ण करण्यासाठी परिश्रम करतो त्याच प्रकारच परिश्रम विद्यार्थ्यांनी शिक्षण प्राप्त करताना केलं पाहिजे.चाणक्य धोरणात चाणक्य असे म्हटले आहे की विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध जीवनशैली पाळत आपले लक्ष्य( Goals) साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जो असे करतो तो यशस्वी होतो.

चाणक्य यांच्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांच लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.निरंतर परिश्रम केले पाहिजेत. विद्यार्थी जीवनकाळत नवीन नवीन विषयांचं अध्यन केलं पाहिजे.अस केल्याने आयुष्य सरळ आणि सुंदर होत.चाणक्यनुसार विद्यार्थ्यांनी सूर्य उगवण्याच्या आधी उठून अंघोळ करून अध्ययन कार्यात व्यस्त झालं पाहिजे.प्रात:काल ही वेळ अध्ययनसाठी खूप महत्त्वाची असते कारण तेव्हा केलेला अभ्यास लक्षात राहतो.

चाणक्ययांच्या मते विद्यार्थ्यांच्या जीवनात अन्नाला विशेष महत्त्व आहे, विद्यार्थ्यांनी पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा.चांगल जेवण केल्याने मन पण चांगल राहत.विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण करण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे.जेव्हा आपण प्रत्येक कार्य वेळेनुसार करता तेव्हा त्यात यश मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments