कारण

‘झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार?’ चंद्रकांत पाटलांचा सवाल

महाराष्ट्रातील वाढता महिला अत्याचार आणि कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्वीट च्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. (Chandrakant patil alleged state government for rise in number of crime.)

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी एक ट्वीट केले आहे. ज्यात महाराष्ट्रात घडणार्‍या गुन्हेगारीची तारखेनुसार आकडेवारी मांडली गेली आहे.  सोबतच हे अस कधीपर्यंत चालणार असा ही सवाल पाटीलांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

या ट्वीट मध्ये चंद्रकांत पाटील लिहतात, ‘आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा राज्यात सुरू असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या, तेव्हा १०-१२ दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पुण्यातील युवतीच्या मृत्यूसारख्या घटना स्मरणात आल्या.

‘ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार? या सर्व गोष्टींची सरकार गंभीर दखल कधी घेणार? झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार ?’ असे सवाल त्यांनी आपल्या ट्वीट मधून उपस्थित केले आहेत

काही दिवसांपूर्वी झालेला युवतीचा संशयास्पद मृत्यू,  साध्या जोर घेतलेले मनसुख हिरेन प्रकरण या सर्व घटनांमुळे भाजप कायदा सुव्यवस्थाच्या प्रश्नावरून अधिकच आक्रमक झाल्याचे दिसते आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments