कारण

चिनी हॅकर्सचं नाव सांगून जबाबदारी झटकली, भाजप मंत्र्यांचा आरोप

सतत धावणारी, पळत राहणारी, स्वप्न सत्यात उतरत नाही तो पर्यंत त्यांचा पाठपुरवठा करणारी स्वप्न नागरी मुंबई थांबली होती काही तासांसाठी ! आठवतोय का तो दिवस 12 ऑक्टोबर 2020 मुंबई आणि  परिसरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद झाला होता, ज्यामुळे मुंबईची लाईफलाईन लोकल सुद्धा थांबली होती. या गोष्टीची दखल आंतरराष्ट्रीय दर्जाला घेतली गेली होती. या गोष्टीस आता अनेक महिने झाले परंतु याच बाबीत एक मोठा खुलासा आता करण्यात येत आहे. (Chandrashekhar Bawankule ask energy minister Nitin Raut to resign from the post.)

महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी 12 ऑक्टोबर 2020 रोजी झालेला प्रकार हा केवळ तांत्रिक बिघाड नसून चीनी हॅकर्स ने केलेला गोंधळ होता. अमेरिकेतील एका सायबर कंपनीच्या मते मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीन मधील हॅकर्सचा हाथ आहे. APT 10 किंवा स्टोन पांडा ही चीनी हॅकर्स ची टोळी या प्रकारे मागे असू शकल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. 

स्टोन पांडा ही चीन मधील प्रसिद्ध हॅकर्स ची टोळी आहे. आणि महत्वाचं म्हणजे चीन सरकारचा या टोळीला पुरेपूर पाठिंबा आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मला या गोष्टीचा अंदाज होताच आणि मी हा अंदाज आधीही वर्तवला होता असे सांगितले. परंतु त्यांच्या या वक्तव्यावर माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. 

माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या प्रकारात हॅकर्सचा काहीही संबंध नसून ही व्यवस्थापनाची चूक असल्याचे सांगितले. “मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या 4 प्रमुख वाहिन्या आहेत. यातील 2 वाहिन्या 9 ऑक्टोबर 2020 रोजी बंद झाल्या होत्या, त्यामुळे सर्व भर तिसऱ्या आणि चौथ्या वाहिनी वर पडला परंतु त्यानंतर तिसरी वाहिनी सुद्धा बंद झाल्याने चौथ्या वाहिनीवर सर्व भर पडल्याने हा अनुचित प्रकार घडला. याला हॅकर्स चे नाव जोडून प्रशासन आपले हाथ झटकत आहे. जर परदेशी हॅकर्स चा खरंच प्रकारात समावेश असता तर केंद्राला या गोष्टीची माहिती का दिली गेली नाही” असे बावनकुळे म्हणाले. सोबतच गृहमंत्री आणि ऊर्जामंत्रींनी राजीनामा द्यावा आणि  असे ही सांगितले. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments