आपलं शहर

मुंबईतील वीज जाण्यामागे ‘या’ बड्या देशाचा मास्टर प्लॅन, गृहमंत्र्यांचा खुलासा…

12 ऑक्टोबर 2020 रोजी अचानक सर्व मुंबईतील वीज खंडीत झाली होती. त्यामागची अनेक कारणे समोर आली होती, तर त्याच्यासंदर्भात अनेकांवर आरोप प्रत्यारोपदेखील करण्यात आले होते, मात्र आता एक धक्कादायक खुलासा त्या घटनेतून समोर आला आहे. (China’s master plan after power outage in Mumbai)

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे. मुंबईत अचानक झालेल्या बत्तीगुलचा तपास इथली सायबर सेल करत होती, त्यांनी दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 2020 च्या ऑक्टोबरमध्ये अचानक संपूर्ण मुंबईतील वीज जाण्यामागे चीनचा हात असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.

रेकॉर्डेड फ्यूचर अॅनलिसिस या अमेरिकन सायबर कंपनीने या संदर्भातला शोध घेतला आहे. वीज यंत्रणेत मॉलवेअर घुसवण्याचा प्रयत्न चीनच्या घुसखोरांनी केला असल्याचं या कंपनीने म्हटलं आहे. नेमका हे कृत्य म्हणजे सायबर हल्लाचं आहे का, याची चौकशी केली जाईल, असं मत अनिल देशमुख यांनी मांडलं आहे.

मुंबईतल्या MSEB मध्ये 8 जीबी फॉरेन डाटा अनअकाऊंटमधून ट्रान्स्फर केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंवा 14 ट्रोजन हार्सेस सर्व्हरमध्ये टाकले असावेत, अशीदेखील शक्याता वर्तवण्यात येत आहेत, या शक्यतांमुळेच 12 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईच्या अनेक भागातील वीज गेल्याचं म्हटलं जात आहे.(China’s master plan after power outage in Mumbai)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments