कारण

काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणचे केवळ फार्स, नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं: देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स 32 रुपये आहे. राज्य सरकारनं 27 रुपये टॅक्स पेट्रोलवर लावला आहे. नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

काँग्रेसला विरोधी पक्षांची जागा घेता येणार नाही. देशात काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे, अशा अवस्थेत मीडिया इवेंट ते करत आहेत. वीज बिलाचा मुद्दा महत्वाचा आहे. वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम राज्यात यापूर्वी कधी झाली नाही. अतिवृष्टीची मदत झाली नाही. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर राज्य सरकारला घेरणार आहोत. मोहन डेलकर यांची आत्महत्या दुर्दैवी आहे. पूजा चव्हाणची आत्महत्या देखील दुर्दैवी आहे. कालच्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्र्यांची परिस्थिती केविलवाणी पाहायला मिळाली.

मुख्यमंत्र्यांनी केवळ ऑडिओ क्लिप खऱ्या आहेत की खोट्या, यवतमाळच्या रुग्णालयात जे घडलं ते खरं की खोट याबाबत उत्तर द्यावं. राज्यात काँग्रेसची अवस्था वाईट आहे, काँग्रेसचा सायकल मोर्चा हा मीडिया इवेंट, 27 रुपये पेट्रोल आणि डिझेलवर त्याठिकाणी लावलेला आहे, खरंच बघितलाच केंद्र सरकारचा एकूण 33 रुपये त्याच्यामध्ये चार रुपये हे कृषी चार रुपये कमिशन आहे, उर्वरित हे पैशात त्यातले 42 टक्के पैसे केंद्र सरकारकडे येतात येथे राज्याला परत करताना राज्य सरकारने मात्र 27 रुपये पेट्रोलवर लावलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की नाना पटोले पश्चाताप समृद्ध असावं किंवा 27 रुपयाचा टॅक्स कमीत कमी करावा आणि दुसरा क्रमांक किंवा इतर राज्यांप्रमाणे किमान दहा रुपये हे पेट्रोल डिझेल स्वस्त करावं आंदोलन असावा तेव्हा दुसरी शंका अशी आहे हुशार आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे. नरेंद्र मोदी यांनी जी लोकं कोरोना लसीबाबत चुकीची माहिती पसरवत होती त्यांना उत्तर दिलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला वेग मिळणार आहे. राज्य मंत्री मंडळातील अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. ते स्वत:च निर्णय घेतात. मुख्यमंत्र्यांनी दिलेले सल्ले मंत्री पाळत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
संविधानानं जी जबाबदारी टाकलेली आहे ती झटकण्याचं काम सुरु आहे. राज्यपालांनी नियम 6 नुसार अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची सूचना दिली आहे. अजित पवार अविश्वास ठराव आणण्याचं आव्हान का देतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments