आपलं शहर

कोरोना वाढला, थेट कोर्टाच्या कामावर परिणाम, न्यायमुर्तींनी लावले नियम

मुंबईतल्या अनेक भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सेशन कोर्टामध्येही काही निर्बंध लावण्यात आले आहेत.

मुंबईतल्या अनेक भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सेशन कोर्टामध्येही काही निर्बंध लावण्यात आले आहेत. (Corona affects the Sessions Court in Mumbai)

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बीएमसीकडून (Mumbai Municipal Corporation) काही निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यातच मुंबईतल्या सेशन कोर्टानेही कामकाजाच्या वेळी काही नियमाली जाहीर केली आहे, त्यामुळे मुंबईकरांचे सेशन कोर्टमध्ये काही काम असल्यास या नियमांचा विचार करूनच तिथे जावं, असे आवाहनही कोर्टाकडून करण्यात आले आहे.

मुंबई सेशन कोर्टात पुन्हा एकदा कामकाजासह न्यायाधिश, वकील, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत निर्बंध लावण्यात येत आहेत. मुंबई सेशन कोर्टाचे प्रिन्सिपल न्यायमूर्ती श्रीनिवास अग्रवाल (Justice Srinivasa Agarwal) यांनी याबाबत नुकताच एक आदेश जारी केला आहे.

न्यायमूर्ती श्रीनिवास अग्रवाल यांनी सविस्तरपणे काही नियम नमूद करून ते नागरिकांसाठी सादर केले आहेत.

  • कोर्टाच कामकाज दोन शिफ्टमध्ये चालेल
  • सकाळी 10.30 ते दुपारी 1 आणि दुपारी 1.30 ते सायंकाळी 4 या वेळेत कोर्टाचे कामकाज चालेल.
  • कोर्टाचे कामकाज कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते यासंकाळी 4.30 पर्यंत चालेल.
  • एखाद्या सुनावणीला जर वकील, तक्रारदार, साक्षीदार किंवा आरोपी गैरहजर असल्यास त्याच्या संबंधी ऑर्डर पास करू नये.
  • अतिमहत्वाच्या कामासाठी आरोपी, साक्षीदार, वकील यांच्यासह संबंधीत व्यक्तींना कोर्टामध्ये प्रवेश दिला जाईल.
  • संबंधीत केसची वेळ आल्यावरच वकील, आरोपी, साक्षीदारांनी कोर्टात प्रवेश करायचा आहे. आणि केसची सुनावणी झाल्यास तात्काळ कोर्टाची परवानगी घेऊन कोर्टातून निघून जायचं आहे.
  • पुढील ऑर्डर येईपर्यंत हे नियम लागू असणार आहेत, असे निर्देश न्यायमूर्ती श्रीनिवास अगरवाल यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments