खूप काही

Mumbai corona Update : बीएमसीने पाऊले उचलली, मुंबईकरांना संताप

मुंबईत कोरोनाचा वर्षांतील उच्चांक, दिवसभरात आढळले 3,062 नवीन रुग्ण

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. यात मुंबईचा ही समावेश आहे. मुंबईत कोरोना रुग्ण संख्येचा वेग वाढल्याने धोका वाढला आहे.

मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे.महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे कोरोना रुग्ण संख्या कमी होत होती.मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग तीन दिवस सर्वाधिक तीन हजार कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यानंतर आज सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज 5185 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद होत असल्याने मुंबईकराची चिंता वाढू लागली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांचा उद्रेक! मुंबईत आज 24 मार्चला 5 हजार 185 कोरोना रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 74 हजार 611 वर पोहचला असून 6 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 606 वर पोहचला आहे. 2088 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 31 हजार 322 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 30 हजार 760 सक्रिय रुग्ण आहेत.कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 % असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 84 दिवस इतका आहे.मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 39 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत तर 432 इमारती कोरोना रुग्ण आढळून आल्याने इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 37 लाख 94 हजार 500 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर असेच काही विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे…..

मुंबईत 6 जानेवारीला 795, त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645 कोरोना रुग्ण आढळून आले होते त्यात वाढ होऊन 1 मार्चला 855, 2 मार्चला 849, 6 मार्च 1188, 7 मार्चला 1360, 10 मार्चला 1539, 11 मार्चला 1508, 12 मार्चला 1646, 13 मार्चला 1708, 14 मार्चला 1962, 15 मार्चला 1712, 16 मार्च 1922, 17 मार्चला 2377, 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईत कोरोनाचे आकडे काही दिवसांपूर्वी कमी झाले होते ते आता पुन्हा एकदा कोरोनाचे आकडे वाढू लागले आहेत , गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाली असून, वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून तातडीने उपाययोजना लागू केल्या जात आहेत.एकिकडे निर्बंध लागू केलेले असताना महापालिकेकडून चाचण्यांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महापालिकेनं आता गर्दीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील सर्व मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांची चाचणी करणे सक्तीचे केलं आहे. मॉलमध्ये प्रवेश करण्याआधी ग्राहकांच्या अँटिजेन चाचण्या केल्या जाणार आहेत….. तसा विचार पालिका आणि राज्य सरकार करत आहे.

मुंबईत एकूण 71 मॉलची संख्या आहे , यातील 25 मोठ्या मॉल मध्ये पालिका लक्ष देत आहेत दररोज मॉल मध्ये हजारो लोक जातात , पण सुट्टीच्या दिवशी मात्र हा आकडा लाखाच्या घरात असेल कोरोनाच्या उद्रेकाला रोखण्यासाठी मिशन टेस्टिंग कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाचा आक्रमक पवित्रा मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर होणार अॅन्टिजेन चाचण्या बंधनकारक करण्याचा पालिकेचा विचार आहे.

मुंबईतील २५ प्रमुख मॉल मध्ये येणा-या प्रत्येक ग्राहकाची अॅन्टिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश पॅलेडियम, फिनीक्स, रुणवाल, इन्फिनीटी , इनॉर्बिट यांसारख्या मोठ्या मॉलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येनं लोक येतात.विक एन्डला मुंबईतील सर्व मॉलमध्ये लाखो लोकांची गर्दी होते…मोठ्या मॉलमध्ये प्रवेशासाठी अॅन्टिजेन चाचणी बंधनकारक केल्यास आपोआप गर्दीला आळा बसेल.खाऊ गल्ली चा स्टाफ , आणि मुंबईतील रेस्टॉरंटस् च्या स्टाफची कोविड चाचणी बंधनकारक मुंबईतील बाहेरगावच्या रेल्वे येणारे ७ मुख्य रेल्वे स्थानकं — वांद्रे, दादर बॉम्बे सेंट्रल, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर दर दिवसाला प्रत्येकी किमान १००० प्रवाशांच्या चाचण्या होणार.
मुंबईतील कोरोना स्थितीबाबत महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात….

मुंबईत कोरोनाचा वर्षांतील उच्चांक, दिवसभरात आढळले ३,०६२ नवीन रुग्ण तर २४ तासांत १० रुग्णांचा मृत्यू. मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ लाख ५५ हजार ८८७ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ५६५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३ लाख २३ हजार २८१ रुग्णांनी कोरोनावर मात असून मुंबईत सध्या २०,१४० सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९१ टक्के तर रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.५६ टक्के असून कोरोना रुग्ण दुपट्टीचा कालावधी – १२४ दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यत ३६,६२,४७२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments