आपलं शहर

Mumbai Local : कोरोना वाढला, लोकलवर पुन्हा निर्बंध? आरोग्यमंत्र्यांचा मुंबईकरांना इशारा…

राज्यात कोरोना रुग्णांचे दिवसेंदिवस आकडे वाढत असताना अनेक निर्बंध पुन्हा लावण्यात येत आहेत. त्यातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांना सुचक इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. पुणे शहरानंतर सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत असल्याचे रिपोर्ट समोर येत आहेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागणार का, असे सवाल निर्माण केले जात आहेत. त्यातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईकरांना सावधानीचा इशारा दिला आहे.  (Will Corona grow again in Mumbai?)

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या असल्यामुळे पुन्हा काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. कदाचित पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, अशी शक्यताही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे, मुंबईकरांनी कोरोनाबद्दल आणि सार्वजनिक ठिकाणांच्या गर्दीबद्दल कठोर नियम पाळले नाहीत तर राज्य सरकारला कठोर नियम करावे लागतील, असं मत राजेश टोपे यांनी वर्तवलं आहे. (Corona likely to re-ban Mumbai local)

येत्या 28 आणि 29 मार्च रोजी राज्यभऱ होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमिवर मुंबई पालिकेकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी आणि नातेवाईकांसोबत होळी साजरी करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या सनांदिवशी मुंबईकर आनंद लूटू शकणार नाही, हे नक्की. (Corona patients increase, big decision of health minister regarding Mumbai local)

bmc 2

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments