आपलं शहर

कोरोनाचा थयथयाट, मुंबईकरांचा आजपासून नव्या गोष्टीशी सामना, नाहीतर कारवाई…

महाराष्ट्रात रविवारी, 21 मार्चरोजी आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 30 हजार 535 कोरोनाचे रुग्ण समोर आल्याने भीती वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे नवीनवीन आकडे समोर येत आहेत, त्यामुळे अनेक निर्बंध लागू केले जात आहेत, अनेक ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन, तर काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच धरतीवर मुंबईतही काही नियम लागू करण्यात आले आहेत. (antigen test will be held at bus, railway station and mall, in mumbai, from today)

मुंबईतल्या अनेक गर्दीच्या ठिकाणी एंटिजन टेस्ट केल्या जाणार आहेत. अनेक मॉलमध्ये, बस स्थानकांवर त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवरदेखील या टेस्ट केल्या जाणार आहेत.

लॉकडाऊननंतर अचानक वाढलेली मुंबईतील गर्दी, हे मुंबईतील कोरोना वाढीचं मुख्य कारण समजलं जात आहे. नागरिकांनी मास्क न वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग न पाळणे अशा अनेक गोष्टींमुळे मुंबईत कोरोना वाढत असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

कोरोना रुग्ण कमी करायचं असेल तर कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नागरिकांच्या एंटिजन टेस्ट तात्काळ कराव्या लागतील, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवले होते, त्याच पार्श्वभूमिवर मुंबई पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतल्या मुख्य रल्वे स्टेशनवर (कालांतराने अनेक रेल्वे स्टेशनवर), महत्वाचे बस स्टँड, मुंबईतले मोठे मॉल अशा ठिकाणी नागरिकांची गर्दी सर्वाधिक असते, त्यामुळे या ठिकाणांवर येणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करणं सोईस्कर होईल, या उद्देशाने बीएमसीने हा निर्णय घेतल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. (antigen test at bus railway station mall)

बीएमसीकडून केल्या जाणाऱ्या एंटिजन टेस्टला नागरिकांनी विरोध केला तर त्यांच्यावर विविध कलमांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचंही बीएमसी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे, त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या या टेस्टिंगला मुंबईकरांना प्रतिसाद द्यावा लागणार आहे, अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागणार आहे. (antigen test will be held at bus, railway station and mall, in mumbai, from today)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments