आपलं शहर

Covid-19: मुंबईत दिवसाला 1,600 तर महाराष्ट्रात 15000 कोरोना रुग्ण

मुंबई (Maharashtra): शुक्रवारी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसली. एका दिवसात मुंबईत 1,600 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर बुधवारी आणि गुरूवारी 1500 कोरोना रुग्ण समोर आल्याचे चित्र आहे. (Covid-19: 1,600 corona patients a day in Mumbai and 15,000 corona patients in Maharashtra)

प्रत्येक 100 चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह 3 रुग्णांचा समावेश असल्याचे मुंबईत चित्र आहे. हे प्रमाण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 3 टक्क्यांवरून 8 टक्क्यांवर आल्याचेही चित्र आहे.

महाराष्ट्रात दररोज 15,000 रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी सकाळपर्यंत 56 लोकांचा तर मुंबईमध्ये 4 लोकांचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे. अनेक रुग्ण लक्षणवेधी आहेत असे BMC च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तरी दैनंदिन प्रकरणांमध्ये सतत होणारी वाढ ही भीषण चित्र आहे. 20,730 चाचण्यांमधून मुंबईतील 1,646 रुग्ण सापडले. एका दिवसात बऱ्या होणारेरुग्ण 1,122 असून शहरात 12,487 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

शुक्रवारी 12 मार्च रोजी ठाण्यात 301 रुग्ण तर नवी-मुंबई, कल्याण-डोंबिवलीमध्ये 247 आणि 428 रुग्ण सापडलेत. नाशिक मध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला असून पुणे, अकोला, नागपूरमध्ये 7 मृत्यू झाले.राज्याचा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93 टक्क्यांपेक्षा खाली आला आहे.

शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात 11,344 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आणि सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 1,10,485 झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सुमारे 30,000 सक्रिय रुग्ण आढळले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments