Mumbai Covid-19: मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कोरोना चाचणी अनिवार्य, चाचणी करण्यास मनाई केल्यास थेट कारवाही

Mumbai: महाराष्ट्रात कोरोणाचा अतिरेक सुरू असताना मुंबईमध्येही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने(BMC) आक्रमक भूमिका घेतली असून आता सार्वजनिक ठिकाणी कोरोना चाचणी करणं नागरिकांसाठी बंधनकारक करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोना चाचणी करून घेण्यास नकार दिल्यावर नागरिकांवर गुन्हा दाखल होणार आहे.
मुंबई शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना रॅपिड अॅन्टिजन टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. मॉलमध्ये दिवसाला किमान 400 जणांची कोरोना चाचणी होणार आहे. रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांवर किमान एक हजार जणांची चाचणी करावी लागणार आहे.या शिवाय गर्दीचे ठिकाणे जस बाजार, खाऊ गल्ली, सरकारी कार्यालय इथे सुद्धा चाचणी करावी लागणार आहे.
मुंबईत महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तसेच शासकीय( government) रुग्णालयांत लसीकरण वेगाने होत असल तरी खासगी (Private) रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.संख्या वाढताच दररोज किमान 1 लाख याप्रमाणे 45 दिवसांत 45 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.