आपलं शहर

Night Curfew : मुंबईकरांनो सावधान, आजपासून बाहेर फिरलात तर भरावा लागणार दंड…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुढील आदेश येईपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आज (रविवारी 28 मार्च) पासून हे नियम लागू करण्यात आले आहेत.

ठाकरे सरकार 28 मार्चपासून रात्रीची संचारबंदी लागू केली आहे, त्याची अंमलबजावणी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांकडून अनेक ठिकाणी बॅरिकेटिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी तपासणी छावण्या उभे केल्या आहेत, जे लोक नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अन्यथा दंड वसूल करण्यात येणार आहे. (Mumbaikars will have to pay a fine if they walk out from today)

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. मुंबईतल्या अनेक भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र रात्रीची संचारबंदी केल्याने नागरिकांच्या फिरण्यावर नियंत्रण येऊ शकते, असे मत सरकारचे आहे. नाईट कर्फ्यूच्या वेळीदेखील नागरिकांनी नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर अजून कठोर नियम लागू करावे लागतील, असं मतही बीएमसी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईत साजऱ्या होणाऱ्या सण आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी तसेच खासगी ठिकाणीही होळी खेळण्यावर निर्बंध लादले आहे.

महानगरपालिकेने एका आदेशात म्हटले आहे की कोरोना संक्रमणाबाबत सरकार विचार करत आहे, होळीला सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणी परवानगी देता येणार नाही, तसं झाल्यास अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतात, असेही मत बीएमसी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. (Curfew imposed in Mumbai and Maharashtra from today, rules announced)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments