आपलं शहर

ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे आम्ही पुन्हा बेरोजगार होऊ, गावी जावं लागेल…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुढील आदेश येईपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आज (रविवारी 28 मार्च) पासून हे नियम लागू करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने रात्रीच्या संचारबंदीचे आदेश दिल्यानंतर अनेक ठिकाणाहून नाराजीचे सूर उमटत आहेत. अशाचवेळी मुंबईच्या समुद्रकिनारी असणाऱ्या फेरीवाल्यांनीही आपलं दुख मांडलं आहे. रात्रीच्या संचारबंदीमुळे समुद्रकिनारी येणारे अनेक पर्यटक बंद होतील, आणि त्यांच्या भरवशावर असणारा आमचा व्यवसाय बंद होईल, अशी भीती फेरीवाल्यांनी व्यक्त केली आहे. (The decision of the Thackeray government will make us unemployed again)

रात्रीच्या संचारबंदीमुळे एकीकडे कोरोना प्रसारावर नियंत्रण आणण्यात यश येईल, रात्रीच्या संचारबंदीमुळे समुद्र किनारी फिरणारे अनेक पर्यटक बंद होणार आहेत, दिवसभर कामात व्यस्त असणारे अनेक लोक रात्रीच्यावेळी समुद्रकिनारी येत असतात, मात्र रात्रीच्या संचारबंदीमुळे तेही बंद होणार आहे, जर असं झालं तर सर्व फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भावना जुहू बीचवरील फेरिवाल्यांनी व्यक्त केली आहे. (Decision of night curfew in Mumbai and Maharashtra)

सरकारने लागू केलेल्या नियमांचं स्वागत आहे, कारण मुंबईसारख्या ठिकाणी अनेक लोक रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. अशा लोकांच्या फिरण्यावर बंदी आणण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. असे मत जुहूवर येणाऱ्या काही पर्यटकांनी व्यक्त केले आहे.

तर काही पर्यटकांनी ठाकरे सरकारने लावलेल्या निर्बंधावर नाराजी व्यक्त केली आहे. रात्रीच्या संचारबंदीची सध्या गरज नाही, लोक समजूतदारपणा दाखवत आहेत, नियमांचे पालन करत आहेत, मुंबईची खरी ओळखही नाईट लाईफने आहे, त्यामुळे सरकारने यावर पुन्हा विचार करावा, असं मत अनेक पर्यटकांनी व्यक्त आहे. (Many peddlers go on hunger strike due to night curfew imposed by Thackeray government)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments