फेमस

Zomato: महिलेने आधी शिवीगाळ करत मारहाण केली, स्वतःच नाकावर मारून घेतल डिलिव्हरी बॉयचा दावा

Banglore: Zomato ऍप वरुण जेवणाची ऑर्डर यायला उशीर झाला म्हणून ऑर्डर रद्द केल्यावरून डिलिव्हरी बॉयने रागात येऊन मारहाण केली असा दावा एका महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ share करून केला होता. पोलिसांनी त्या डिलिव्हरी बॉयला अटक केली असून त्याला कामावरून काढून टाकण्यात आलेले आहे.पण या डिलिव्हरी बॉयने वेगळाच दावा केलेला आहे.

कामराज असं या डिलिव्हरी बॉयच नाव आहे. त्याच्या म्हणण्यानुसार ऑर्डर पोहोचण्यास उशीर झाला म्हणून महिलेने त्याला शिवीगाळ करण्यास सूरुवात केली आणि चपलेने मारहाण ही केली.ऑर्डर घरी पोहचवून दिल्यावर तो पैसे देण्याची वाट पाहत होता. ऑर्डर cash on delivery अशी होती. ऑर्डर पोहचण्यास उशीर झाला म्हणून तो महिलेची माफी मागत होता पण ती रागात होती.

रस्ता खराब असल्यामुळे आणि ट्रॅफिक असल्यामुळे ऑर्डर पोहोचण्यास उशीर झाला अस त्याच म्हणणं आहे. ऑर्डर घेतल्यावर पैसे देण्यास नकार देत होती आणि Zomato chat स्पोर्टसशी ती बोलत होती.बोलून झाल्यावर तिने ऑर्डर रद्द केली आणि जेवण परत देण्यास नकार दिला आणि त्याला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तेव्हा तिने स्वतःच्या अंगठीने नाकावर मारून घेत जखम करून घेतली अस डिलिव्हरी बॉय कामराज यांचं म्हणणं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments