आपलं शहर

मरिन ड्राईव्हवर चुकूनसुद्धा ही चूक करु नका, नाहीतर पडेल महागात…

कोरोना काळात सार्वजनीक ठिकाणी सगळ्यांनी मास्क घालून वावरावं, असा नियम मुंबई महानगरपालिकेने केला आहे. मात्र हा नियम सगळेचजण पाळत नाहीत, त्या नियम न पाळणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी पालिकेकडून क्लिन अप मार्शलची (clean-up marshals) नियुक्ती केली आहे. (Deployed a clean up marshal on Marine Drive, taking action against those who do not wear masks)

तुम्ही जर मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीसारख्या ठिकाणी फिरण्यासाठी गेला असाल, तर तुम्हाला याचा अनुभव जास्त येईल. मरिनवर आलेल्या अनेक तरुण-तरुणींसह नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी इथे शेकडो मार्शल तैनात करण्यात आले आहेत.

मरिनवर फिरताना चुकूनजरी तुम्ही मास्क काढला तर क्लिन अप मार्शलकडून तुम्हाला दंड आकरला जातो. त्यामुळे सेल्फी काढण्याच्या किंवा मोकळी हवा घेण्याच्या कारणाने जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील मास्क काढला असाल, तर तुम्हाला त्याबद्दलचा दंड भरावा लागणार, हे नक्की.

मुंबईच्या अनेक सार्वजनिक ठिकाणी क्लिन अप मार्शल मास्क न घातलेल्या लोकांवर कारवाई करताना दिसत आहेत. मात्र हे सगळं सुरु असताना क्लिन अप मार्शलला अनेकजण त्यांना अपमानाची वागणूक देत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मरिनवरही असे अनेक प्रकार घडताना दिसतात,मात्र क्लिन अप मार्शलशी जर तुम्ही पंगा घेण्याचा विचार करत असाल, तर तिथे तैनात करण्यात आलेले पोलीसदेखील तुमची चांगलीच हजेरी घेऊ शकतात. (Deployed a clean up marshal on Marine Drive, taking action against those who do not wear masks)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments