आपलं शहर

मोठी बातमी: मुंबई गुन्हे शाखेच्या तब्बल 65 अधिकाऱ्यांची बदली

Mumbai: उद्योगपती (buisnessman) मुकेश अंबानी धमकी आणि बॉम्ब प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू आणि सचिन वाझे प्रकरणांमुळे राज्य सरकार चांगलच अडचणीत सापडले आहे.या सगळ्या मध्ये मुंबई पोलिस दलात मोठे बदल करण्यात आलेले आहेत.मुंबई गुन्हे शाखेच्या (crime branch) एकूण 65 पोलिसांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

संपूर्ण राज्यातून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे.मुंबईतील सर्व युनिट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आलेल्या आहेत.सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलीस दलात पाठवण्यात आलंय. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत.

विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होत आहे. 15 वर्षांपासून निलंबित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेतलं जातं. याच पोलिसावर खंडणीचे आरोप होतात,राज्याच पोलीस दलावरील विश्वास उडाल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.पोलिसांच्या बदल्यांचे रॅकेट सुरू आहे असे आरोप देवंद्र फडणवीस यांनी केले आहेत.

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments