कारण

Maharashtra budget 2021: “कुठल्याही योजना बघा, सगळ्याचं केंद्र सरकारच्या, देवेंद्र फडवीसांचा टोला

आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विधानभवनात एकच खळबळ उडाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पावरून राज्य सरकारवर टीका करत चांगलेच तोंड सुख घेतले आहे. (Devendra Fadnvis alleged state government after the presentation of budget 2021)

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पाला ‘याला राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचा कि काही विशिष्ट भागाचा म्हणायचा’ असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सुद्धा फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी आपली नाराजी व्यक्त करताना “प्रामाणिक शेतकऱ्यांना काहीही मिळालं नाही. मूळ कर्जमाहिफीच्या योजनेत 45 टक्के शेतकरी वंचित राहिले असून त्यांना एका नव्या पैश्याची मदत झाली नाही शेतकऱ्यांना धान्यासाठी, वीज बिलासाठी कुठल्याही प्रकारे सवलत दिलेली नाही. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज ही फसवणूक ची बाब आहे. महाराष्ट्रात 80% शेतकर्यांची कर्ज घेण्याची मर्यादाच 50 हजार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.” असं ते म्हणाले. सरकारने जाहीर केलेल्या संकल्पात शेतकरी वर्गाला कोणत्याच प्रकारे लाभ मिळाला नसून त्यांची केवळ फसवणूक केली गेली आहे असा आरोप फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला.

फडणवीसांनी दुसरा निशाणा साधला पायभूत सुविधांच्या योजनांवर फडणवीसांच्या मते संकल्पात मांडल्या गेलेल्या सुविधा या केंद्र सरकारच्या योजना असून राज्यसरकारने कोणत्याही प्रकारची नवीन योजना सादर केलेली नाही.
“पायाभूत सुविधा एकतर सुरु असलेले प्रकल्प आहेत, किंवा केंद्र सरकारच्या योजना आहेत. रस्ते, सिंचन, रेल्वे, कुठलही क्षेत्र घ्या कुठल्याही योजना बघा केंद्र सरकारच्या योजना आहेत. त्यांनी जाहीर केल्या ठीक आहेत. परंतु हे सांगायला सरकार विसरलं.” अस फडणवीस म्हणाले.

प्रचीन मंदिरांच्या संदर्भांत केलेल्या घोषणा सुद्धा नवीन नसून आधीच्या सरकारच्या योजना असल्याचा आरोप देवेंद्र फडवीसानी केला. फडणवीस म्हणाले,“ काही योजना तर आमच्या काळात सुरु झालेल्या प्रकल्पाच्या आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचा एकही प्रकल्प राज्य सरकारने केलेला नाही. प्राचीन मंदिराच्या संदर्भातील घोषणा या सुरु असलेल्या या आधीच्या सरकारन केलेल्या कामांच्याच योजना आहेत.”

एकंदरीत राज्यरकरने कोणत्याही प्रकारच्या नवीन योजना सादर केल्या नसून सुरु असलेल्याच योजना आणि केंद्र सरकारच्या योजना पुन्हा सादर केल्याचे गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर करत पुरेपु तोंडसुख उपभोगले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments