कारण

Mansukh Hiren Death | फडणविसांच्या आरोपांवर धनंजय गावडेंची प्रतिक्रिया, कोण आहेत धनंजय गावडे

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा 5 मार्च रोजी ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर खाडी येथे मृतदेह सापडला होता. हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र हिरेन यांनी आत्महत्या न करता त्यांचा खून झाल्याचा संशय त्यांच्या पत्नीने केला आहे. हिरेन यांच्या पत्नीने सचिन वझे यांच्यावर आपला संशय असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सचिन वझे यांच्यावर आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.

पोलिसांना मनसुख हिरेन यांचा मोबाईल अजूनही सापडला नाही आहे. मात्र तपासादरम्यान हिरेन यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन वसई येथे आहे. याच मुद्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे वसई-विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर आरोप केला आहे. फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर धनंजय गावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“माझा काही संबंध नाही…”

मनसुख हिरेन कोण आहेत हे मला माहिती नाही. त्यांचा आणि माझा काही संबंध नाही आहे. फडणवीसांनी जे आरोप केले आहेत ते एका बिल्डरच्या सांगण्यावरून केले आहेत. त्या बिल्डरला वाचविण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचले गेले आहे, असा पलटवार धनंजय गावडे यांनी केला. तसेच, वसई-विरार मध्ये कोणताही गुन्हा घडला तर विनाकारण माझा संबंध जोडणार का, असा सवाल गावडे यांनी केला आहे.

कोण आहेत धनंजय गावडे?

धनंजय गावडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून काम पहिले आहे. 2015 च्या महापालिका निवडणूकीत शिवसेनेकडून ते नालासोपारा परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरसेवक असताना गावडे यांनी माहितीचा अधिकारांतर्गत वसई-विरार मधील अनाधिकृत बांधकामाच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. नोटबंदीच्या काळात गावडे यांच्याकडे जवळपास 1 कोटी 22 लाखांच्या नवीन नोटा सापडल्या होत्या. तसेच गावडे यांच्यावर अनेक तक्रारींची नोंद आहे. एकामागून एक गुन्हे दाखल झाल्यामुळे गेले 2 वर्ष गावडे वसई-विरार, नालासोपारा या परिसरातून फरार होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केल्यामुळे गावडे वसई-विरारमध्ये परत आल्याचे कळत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments