आपलं शहर

मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या हाफकिनबद्दल ‘या’ जुन्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबईतल्या परळमध्ये आहे. पोर्तुगीजांनी 1673 मध्ये हाफकिनची इमारत बांधण्यास सुरुवात केली. फ्रान्सिस्कन मठासाठी ही इमारत बांधण्यात आली होती

हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबईतल्या परळमध्ये आहे. पोर्तुगीजांनी 1673 मध्ये हाफकिनची इमारत बांधण्यास सुरुवात केली. फ्रान्सिस्कन मठासाठी ही इमारत बांधण्यात आली होती. त्यानंतर गव्हर्नर कून यांनी 1719 मध्ये ही वास्तू ताब्यात घेतली. 1750 नंतर गव्हर्नरचे निवासस्थान म्हणून या वास्तूचा वापर केला गेला. (Do you know these things about the Halfkin Institute?)

1899 मध्ये ही वास्तू हाफकिनच्या ताब्यात दिली. “प्लेग रिसर्च लॅबोरेटरी” नावाच्या बॅक्टेरियोलॉजी रिसर्च सेंटर म्हणून डॉ. वाल्डेमार मोर्डेकाई हाफकिन यांनी 10 ऑगस्ट 1899 रोजी याची स्थापना केली. त्यानंतर या वास्तूत लसींवरील संशोधन सुरू करण्यात आलं.

साथीच्या आजारांचा अभ्यास करणे, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय शोधणे, या आजारांविरोधातील प्रतिबंधात्मक लस निर्मितीची शक्यता तपासणे अशी अनेक कामे या ठिकाणी सुरु करण्यात आली.

या संस्थेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, विषाणुशास्त्र, पेशीय जीवशास्त्र असे अनेक विभाग असून त्यांच्यावर इथे संशोधन केलं जातं.

हाफकिन इन्स्टिट्यूटने साथीच्या आजारांवरील अनेक महत्त्वाच्या लसींचा शोध लावला आहे. 1899-1904 या काळात प्लेल्गची साथ आली होती. तेव्हा या संस्थेने प्लेगच्या लसीवर अभ्यास करून लस शोधून तिचा देशभर पुरवठा केला.

या शिवाय 2005 मध्ये उद्भवलेला लेप्टो स्पायरोसीसचा प्रादुर्भाव, त्यानंतर 2009 मध्ये निर्माण झालेला स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव तसेच अॅन्थ्रेक्स आदी वेगवेगळ्या विषाणू हल्ल्याच्या वेळी हाफकिनमधील विषाणुशास्त्र विभागाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. याचबरोबर कॉलरा, प्लेग, सर्पदंश (विष) विरोधी लस, तोंडातून देता येणारी पोलिओची लस, घटसर्प, डांग्या खोकला धनुर्वात अशा अनेक आजारांवरील लसींचादेखील या ठिकाणी शोध लावला आहे.

2014 पासून हाफकिनमध्ये एड्स प्रतिबंधक लसीवर संशोधन सुरू आहे. एचआयव्ही विरोधात कार्य करू शकणाऱ्या काही जैवकणांवर देखील ही संस्था संशोधन करत आहे. कोणत्याही नव्या लसींची निर्मिती केल्यानंतर तिच्या चाचणीसाठी प्राण्यांची आवश्यकता असते. त्यामुळे या संस्थेत प्राण्यांसाठी मोठी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत उंदीर, ससे, गिनीपिंग आदी प्राणी असून त्यांच्या प्रजननाची सुविधादेखील इथे उपलब्ध आहे.

प्राण्यांच्या प्रयोगशाळेसह संस्थेत सर्पगृह देखील आहेत. या सर्पगृहात भारतातील सर्व जातीचे विषारी साप या सर्पगृहात आहेत. त्याचप्रमाणे प्रतिरक्तद्रवाच्या उत्पादनासाठी घोड्यांचा उपयोग होत असल्याने घोडेही इथे पाळले आहेत.

भारतला पोलिओ मुक्त करण्यामध्ये हाफकिन संस्थेने मोलाची भूमिका बजावली आहे. इथे तयार केलेली पोलिओची लस 45 देशांना पुरविण्यात आली होती. हाफकिनने आतापर्यंत 68 औषधे संशोधन करून बनविली आहे. या संस्थेने सहा महिन्यात 28 कोटी पोलीओ डोस तयार करण्याची किमया केली आहे. (Do you know these things about the Halfkin Institute?)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments