खूप काही

कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन? IPS अधिकाऱ्यांचा थेट सरकारी तज्ज्ञांना सवाल…

नॅशनल टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एनके अरोडा यांनी भारतीय पोलीस सेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत देशातील कोरोना परिस्थितीवर आढावा बैठक घेतली होती.

नॅशनल टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एनके अरोडा यांनी भारतीय पोलीस सेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत देशातील कोरोना परिस्थितीवर आढावा बैठक घेतली होती. (Dr. NK Arora, Head of National Task Force talk with ips Officer)

IPS अधिकाऱ्यांची कोरोनाच्या लसी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आदित्य मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे. युरोपमध्ये कोरोनावर उपचारासाठी ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका लसीवर (Oxford-astraZeneca vaccine) चर्चा केली जात होती. त्यामुळे भारतातही कशाप्रकारे नियोजन करता येईल, यावर चर्चा केली जात आहे.

भारत बायोटेकद्वारे बनवलेल्या कोव्हॅक्सिनलाही जगातून प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे युरोपियन देशांनीही कोव्हॅक्सिनबद्दल चांगला प्रतिसाद दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील कोव्हॅक्सिनबद्दल चांगला प्रतिसाद दिल्यामुळे राष्ट्रीय टास्क फोर्सचे (National task force) प्रमुख डॉ. एनके अरोडा यांनी कोव्हॅक्सिनच्या नियोजनासह त्याच्या उत्पादनावरही भाष्य केलं आहे.

कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन? कोणती लस प्रवाभी

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया दोन्ही लशींमध्ये तुलना करणे थोडं अवघड आहे, मात्र तुलनात्मकदृष्ट्या सांगण्यासाठी काही महिन्यांची वाट पाहावी लागेल, दोन्ही लसी तितक्याच प्रभावी आहेत. कोव्हॅक्सिन निष्क्रिय प्लॅटफॉर्म वापरते,तर कोविशिल्ड व्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्मचा उपयोग करतात, शरीरात स्पाइक प्रथिने घालण्यासाठी कोव्हिशिल्डचा वापर केला जातो.

दोन्ही सध्या इंट्रामस्क्युलर पाथवेद्वारे विक्री केली जात आहे. दोन्ही लशींमुळे प्रतिपिंडे चांगली प्रमाणात तयार होतात. सध्या देशात दोन्ही लशींना मान्यता मिळाली असल्याने दोन्ही लसी कोरोनावर प्रभावी समजल्या जात आहेत.(Covaxin or covishield)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments