खूप काही

Dubai: जगातली सगळ्यात मोठी कॅनव्हास पेंटिंग बनवणाऱ्याला मिळाले 450 करोड

Dubai: दुबईमध्ये एका पेंटिंगची निलामी 45 मिलियन पाउंड (तब्बल 450 करोड) इतकी झाली आहे.जगातील सर्वात मोठ्या कॅनव्हास पेंटिंगवर तयार केलेली ही सर्वात मोठी कलाकृती आहे.रॉयटर्सच्या एका अहवालानुसार ही पेंटिंग ब्रिटिश आर्टिस्ट सचा जाफरी यांनी बनवला आहे.

ही पेंटिंग 17,176 स्क्वायर फीट इतकी मोठी आहे ज्याची जागा 6 टेनिस कोर्ट बराबर आहे.ही पेंटिंग बनवण्यासाठी1065 पेंट ब्रश और 6300 लीटर पेंट वापरण्यात आला आहे.दुबईतील अटलांटिस हॉटेलच्या बॉलरूमच्या मजल्यावरील मोठ्या कॅनव्हासवर पेंटिंग केली गेली होती. कोरोना साथीच्या लॉकडाऊनमध्ये सात महिन्यांत काढले गेले आहे.

अहवालानुसार संपूर्ण चित्रकला लिलावासाठी 70 लॉटमध्ये विभागली गेली होती. पण ते सगळे लॉट अँड्रे अबादौन यांनी मिळून विकत घेतल्या. अँड्रे हा फ्रान्सचा असून त्याचा क्रिप्टोकरन्सी व्यवसाय आहे.जाफरी च म्हणणं आहे की नीलामीचा उद्देश लहान मुलांच्या आयुष्यात बदलाव आण्याचा आहे.जाफरीचा पेंटिंग काही भागांमध्ये विकून 3 करोड डॉलर कमावण्याचा उद्देश होता पण अँड्रेने अख्ख्या पेंटिंगची बोली लावली.

या पेंटिंगच्या नीलामीची रक्कम जगातील दुसरी महागडी बोली आहे. 2018 मध्ये एका निलामीमध्ये David Hockney ची 1972 ची पेंटिंग ‘Portrait of an Artist (Pool with Two Figures) साठी 90.3 मिलियन डॉलरची बोली लावली होती.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments