कारण

माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या काळातही झाला होता पोलीस अधिकाऱ्यांवर अन्याय, केली होती आत्महत्या…

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी केली होती आत्महत्या.

आठवडाभरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवनप्रवास संपविल्याने पोलीस दलाला हादरा बसलेला,
सादरे यांनी सुसाईड नोटमध्ये पोलीस दलातील भ्रष्टाचार आणि अपप्रवृत्तींचा उल्लेख करुन जगासमोर आणला.

जळगावच्या रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी नाशिकमधल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक जालिंदर सुपेकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सादरे यांच्या सुसाईड नोटवरुन समोर आलंय.
सादरे यांच्या आत्महत्येमुळं खाकी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. या सगळ्या प्रकारावर पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित काय कारवाई करतात याकडं नजरा लागल्यात. दरम्यान या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी आणि सखोल चौकशीची मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात येतेय.

पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये संबंधित अधिकारी आणि वाळू तस्कराविरोधात कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला परंतु दाखल झालेल्या प्रत्येक गुन्ह्यात संशयितांना अटक होतेच असे नाही.चौकशीदरम्यान कोणी अधिकारी दोषी आढळून आले तर गृहमंत्रालयाच्या मंजुरीने त्यांना अटक करण्यात येते. चौकशीत समोर येणाऱ्या पुराव्यानुसार तपास अधिकारी तो निर्णय घेतो.

त्या वेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. फडणवीस सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सामाजिक प्राधिकरणाकडे लक्ष दिले असते तर सादरेंसारख्या अनेक पोलिसांना जीवनप्रवास संपवावा नसता लागला.प्रामाणिक अधिका-यांना जळगाव जिल्ह्यात नोकरी करणं अवघड झालंय असे त्या सुसाईड नोट मध्ये लिहिले होते.

दरम्यान या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी आणि सखोल चौकशीची मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली .

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments