खूप काही

Instagram: लवकरच 13 वर्षांखालील लहान मुलांसाठी इंस्टाग्राम होणार लाँच

तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले इंस्टाग्राम (Instagram) हे ॲप्लीकेशन लवकरच 13 वर्षांखालील लहान मुलांसाठी लाँच होणार असल्याची चर्चा आहे.

तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले इंस्टाग्राम (Instagram) हे ॲप्लीकेशन लवकरच 13 वर्षांखालील लहान मुलांसाठी लाँच होणार असल्याची चर्चा आहे. फेसबूक सध्या इंस्टाग्रामच्या नवीन व्हर्जनवर काम करत आहे. हे व्हर्जन केवळ 13 वर्षांखालील लहान मुलांसाठी असणार आहे. (Facebook may launch Instagram for kids under age 13)

एका प्रसिद्ध वेब पोर्टलनुसार इंस्टाग्राम सध्या केवळ लहान मुलांसाठीच वैद्य असणारे ॲप तयार करत आहे. इंस्टाग्राम हे ॲप तरूणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. फोटो, व्हिडिओ, रिल्स, अश्या विविध फिचर्स असणारे हे ॲप आता लहान मुलांनादेखील आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले आहे.

सध्या, इंस्टाग्रामवर 13 वर्षांवरील व्यक्तीला आपले अकाऊंट तयार करता येते. दरम्यान, कंपनी हेदेखील जाणून आहे की अनेकजण आपली खोटी माहिती देऊन, वय लपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता इंस्टाग्राम आर्टिफिशल इंटेलिजंस (Artificial Intelligence) द्वारे यूजरचे खरे वय शोधून काढू शकणार आहे. (Facebook may launch Instagram for kids under age 13)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments