कारण

Covid Vaccination: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस; केलं हे आवाहन…

महाराष्ट्रामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात अनेक राजकीय नेत्यांनी लसीकरण करून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, खासदार सुप्रिया सुळे यांनी लस टोचून घेतली होती. (First dose of corona vaccine taken by Chief Minister Uddhav Thackeray)

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात लस टोचून घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि डॉ. तात्याराव लहाने हे उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस देण्यात आली आहे.

“कोरोनाच्या लसीबाबत कोणत्याही प्रकारची भीती आणि संभ्रम ठेऊ नका. मी स्वतः कोरोनाची लस घेतलीय. लस घेताना आपल्याला कळतही नाही, इतक्या चांगल्या पद्धतीनं लस देण्यात येते.” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरण झाल्यानंतर दिली. तसेच, “कोरोनाचा धोका आता वाढतो आहे. त्यामुळे लस घेण्यास जे लोक पात्र आहेत त्यांनी मनात कोणतेही किंतू परंतु न आणता ही लस घ्यावी,” अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केली आहे. (First dose of corona vaccine taken by Chief Minister Uddhav Thackeray)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments