खूप काही

Gold silver rate | आज सोन्याच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

फेब्रुवारी महिन्या मध्ये 100 ग्राम सोन्याचा दर 48 हजार 450 होता परंतु या महिन्यात सोन्याचा 44 हजार पर्यंत कमी झाला आहे.

फेब्रुवारी महिन्या मध्ये 100 ग्राम सोन्याचा दर 48 हजार 450 होता परंतु या महिन्यात सोन्याचा 44 हजार पर्यंत कमी झाला आहे. फेब्रुवारी महिन्यातला प्रतिकिलो चांदीचा दर 73 हजार पर्यंत पोहोचला होता परंतु सध्या दर 7 हजार ने कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. (Gold silver rate Rising gold prices today find out today’s rates)

सलग पाच दिवस सोन्याच्या किंमतीत घट होत होती परंतु आजच्या सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 020 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 020 रुपये इतका आहे. गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. 10 ग्राम सोन्यामध्ये 1020 रुपयांची वाढ झाली असून 100ग्राम सोन्याच्या किंमतीत 10 हजार 200 रुपयांची वाढ झाली आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 402 रुपये
8 ग्राम 35 हजार 216 रुपये
10 ग्राम 44 हजार 020 रुपये
100 ग्राम 4 लाख 40 हजार 200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 502 रुपये
8 ग्राम 36 हजार 016 रुपये
10 ग्राम 45 हजार 020 रुपये
100 ग्राम 4 लाख 50 हजार 200 रुपये

चांदीच्या दरात दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. आज देखील दरात घसरण दिसून येते. मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 65 हजार 300 रुपये असून आजच्या चांदीच्या दरात 700 रुपयांची घट झाली आहे.

चांदीचे दर
1 ग्राम 65.30 रुपये
8 ग्राम 522.40 रुपये
10 ग्राम 653 रुपये
100 ग्राम 6 हजार 530 रुपये
1 किलो 65 हजार 300 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments