खूप काही

फक्त महिलांसाठी गुगलकडून 2.5 कोटी डॉलर्सची घोषणा, नेमकं काय आहे विशेष…

आज संपूर्ण जगात जागतिक महिला दिनाचा उत्साह आहे. अशातच गूगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी भारतातील ग्रामीण महिला उद्योजिकांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. भारतातील 10 लाख ग्रामीण महिला उद्योजिकांना गूगल मदत करणार आहे.

भारत तसेच जगभरातील महिलांना आर्थिक रुपाने मजबूत करण्यासाठी सुंदर पिचाई यांनी 2.5 कोटी डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम भारत आणि जगभरातील नॉन-प्रॉफिट आणि सोशल एंटरप्राइजेसना अनुदान म्हणून दिली जाणार आहे. भारतातील ग्रामीण भागातील 10 लाख महिलांना गूगल इंटरनेट साथी (Internet Saathi) प्रोग्राम मध्ये बिझनेस ट्यूटोरियल, टूल्स आणि मेंबरशिपच्या माध्यमातून मदत केली जाईल.

“वूमन विल” वेब प्लॅटफॉर्म

गूगलने आणखी एका चांगल्या उपक्रमाची सुरूवात आज केली आहे. वर्चूअल गूगल फॉर इंडिया (Google For India) या उपक्रमांतर्गत “वूमन विल” (Women Will) हे वेब प्लॅटफॉर्म आज लॉन्च करण्यात आले. यामध्ये ग्रामीण महिला उद्योजिकांना कम्यूनिटी सपोर्ट, मेंटरशिप आणि ऍक्सेलरेटर प्रोग्राम मध्ये मदत केली जाणार आहे. ही सेवा हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये असणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments