आपलं शहर

कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेचं मिशन टेस्टिंग, मुंबईकरांना द्यावा लागणार पाठिंबा

Mumbai: मुंबईत कोरोनाचे रुग्णांचे आकडे काही दिवसांपूर्वी कमी झाले होते पण आता कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाली असून, वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून तातडीने उपाययोजना लागू केल्या जात आहेत.

एकिकडे निर्बंध लागू केलेले असताना महापालिकेकडून चाचण्यांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महापालिकेनं आता मुंबईतील सर्व मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांची चाचणी करणे सक्तीचे केलं आहे.मुंबईतील मॉल, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर अँटीजेन चाचण्या बंधनकारक करण्याचा विचार चालू आहे.

खाऊ गल्लीचा स्टाफ आणि मुंबईतील रेस्टॉरंटसच्या स्टाफची कोविड चाचणी बंधनकारक आहे. मुंबईत बाहेरगावच्या येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या विशेषतः विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या होणार.मुंबईतील मुख्य बस स्थानक दादर, परळ येथे दररोज 1000 प्रवाशांच्या चाचण्या होणार.

मुंबईत दिवसभरात 3,062 नवीन रुग्ण आधळून आले आणि गेल्या 24 तासात 10. रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.मुंबईत सध्या 20,140 सक्रिय(active) रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91% वर आहे. मुंबईत आत्तापर्यंत 34 चाळी व झोपडपट्टीमध्ये कंटेंटमेंटझोन म्हणून डीक्लेर केले आहेत आणि 305 इमारती सिल करण्यात आलेल्या आहेत.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments