खूप काही

Happy Birthday Aamir Khan: प्रेक्षकांना भावलेल्या आमिरच्या सर्वोत्कृष्ट भूमिका..

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट सुपरस्टार आमिर खान आज आपला 56वां वाढदिवस साजरा करत आहे. 30 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये आमिरने 58 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या कारकिर्दीतील काही भूमिका अशा आहेत ज्यांना प्रेक्षक कधीच विसरू शकत नाहीत. आमिर खानच्या वाढदिवसानिमित्त प्रेक्षकांना भावलेल्या त्याच्या काही ‘आयकॉनिक’ भूमिकांविषयीचा हा खास लेख.

1. भुवन (लगान)
2001 साली प्रदर्शित झालेला आशुतोष गोवारीकरचा ‘लगान’ हा चित्रपट आमिरच्या कारकिर्दीतील महत्वाचा चित्रपट ठरला. या चित्रपटामध्ये आमिरने ‘भुवन’ या खेड्यातील तरूणाची भूमिका साकारली होती. लगान मधील आमिरच्या भूमिकेची प्रेक्षकांनी खूप प्रशंसा केली होती. विशेष म्हणजे आजही लगान आणि त्यामधली आमिरची भूमिका सर्वांना आवडते. जेव्हा लगान रिलीज झाला त्यावेळी सनी देओलच्या ‘गदर – एक प्रेम कथा’ या चित्रपटासोबत सर्वात जास्त काळ चालणारा चित्रपट ठरला.

2. रँचो (3 इडियट्स)
वयाच्या 40व्या वर्षी एका 18-20 वर्षांच्या कॉलेज तरुणाची भूमिका साकारणे हे एक चॅलेंज आहे. मात्र आमिरने ते चॅलेंज स्विकारले आणि यशस्वीपणे पूर्ण केले. थ्री इडियट्समधील आमिरची भूमिका पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. चित्रपटातील त्याच्या लूकमूळे सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.

3. संजय सिंघानिया (गजनी)
गजनी हा चित्रपट आमिरच्या कारकिर्दीतील आयकॉनिक कलाकृती आहे. या चित्रपटातील त्याची भूमिकाही तितकीच खास आहे. या चित्रपटात आमिरच्या भूमिकेचे अनेक शेड्स दाखविण्यात आले आहे. एक सामान्य माणूस, एक प्रेमी आणि एक मानसिक रोगीच्या रूपात आमिर खानने या चित्रपटात चार-चाँद लावले.

4. मंगल पांडे (मंगल पांडे – द रायझिंग)
आमिर खानने ‘मंगल पांडे – द रायझिंग’ या चित्रपटामध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचे नायक असणारे क्रांतिकारी मंगल पांडे यांचे भूमिका साकारली होती. या भूमिकेत आमिर वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळाला होता. चित्रपटाने जरी जास्त कमाई केली नसली तरी आमिरचा लूक आजपर्यंत प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

5. महावीर सिंह फोगाट (दंगल)
दंगल हा चित्रपट केवळ भारतातंच नाही तर संपूर्ण जगात सुपरहीट ठरला. या चित्रपटात आमिरने पैलवान महावीर सिंह फोगाट यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी आमिरने त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली होती. त्याने फिट राहण्यासोबतच भूमिकेसाठी वजन देखील वाढवले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments