खूप काही

Video Ind vs Eng : इंग्लंडचा होश उडवणारा नवा जोश, येतोय भारताचा थरारक ऑलराऊंडर

हार्दिक पंड्या हा कमी चेंडूत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज मानला जातो. फक्त फलंदाजच नाही, तर सर्वोत्तम गोलंदाजांमध्येही त्याची गिनती केली जाते. हार्दिककडे त्याच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर कोणताही सामना पलटून टाकण्याची ताकद आहे. तसे अनेक सामनेदेखील आपण पाहिले आहेत. (Indian team ready for T20 series against England)

12 मार्चपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी -20 मालिका होणार आहे. त्याच्या तयारीसाठी भारतासह इंग्लंडचे सर्वच खेळाडू जोरदार तयारीला लागले आहेत. हार्दिकनेही आपल्या फलंदाजीचा आणि गोलंदाजीचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा खेळाचा अंदाज दिसून येत आहे.

हार्दिकने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो नेटमध्ये फलंदाजी करताना आणि प्रत्येक चेंडूवर लांब शॉट लगावताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी हार्दिक गोलंदाजी करतानाही दिसला आहे. हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, Preparation done, Can’t wait to get on the field on 12th. सगळी तयारी झालेय, आता प्रतीक्षा फक्त 12 मार्चची.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत टीम इंडियाने विजय पटकवला. त्यानंतर हार्दिकने कुठलेच सामने खेळले नाहीत, परंतु हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की तो जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये आपला खेळ दाखवण्यास तयार आहे. (Hardik Pandya ready to play against England, shared a video while practicing in the net)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments