खूप काही

Zomato row: आरोप करणाऱ्या मुलीने बंगळूरूतून काढला पळ; पोलीस म्हणाले..

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉय कामराज वर हितेशा चंद्राणी हीने मारहाण झाल्याची तक्रार केली होती. मात्र आत आरोप करणारी हितेशाच बंगळूरू सोडून गेल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर एक प्रकरण चांगलंच गाजत आहे. ते प्रकरण म्हणजे Zomato चा डिलिव्हरी बॉय कामराज याने बंगळूरमधील हितेशा चंद्राणीला मारहाण केली असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. हितेशाने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर याबाबतचा व्हिडीओ शेअर केला होता. (Hitesha Chandranee flees Bengaluru after Kamraj files FIR)


त्या व्हिडीओनंतर सोशल मिडीयावर काहीजण हितेशाला झालेली मारहाण खरी आहे असं म्हणत आहेत. तर दुसरीकडे अनेकजण असेही आहेत जे कामराज निर्दोष आहे असं म्हणत आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर दोन गट निर्माण झाले आहेत. दरम्यान, ज्या महिलेने आपल्यावर मारहाण झाल्याचे आरोप केले होते आता तीच बंगळूरू सोडून पळाली असल्याची चर्चा आहे. (Hitesha Chandranee flees Bengaluru after Kamraj files FIR)

हितेशा चंद्राणी या महिलेने केलेल्या आरोपांविरोधात झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कामराजने तिच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेचंच हितेशाने कामराज विरोधात बंगळूरू पोलिसांत मारहाण झाल्याची तक्रार केली होती. मात्र यानंतर कुणीतरी हितेशाच्या घराचा पत्ता सोशल मिडियावर व्हायरल केला. यामुळेच हितेशा बंगळूरू सोडून गेली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

बंगळूरू पोलिसांनुसार हितेशाच्या घराचा पत्ता व्हायरल झाल्याने ती तिच्या त्या घरी राहण्यास घाबरत आहे. या कारणामुळे कदाचित ती बंगळूरू सोडून गेली आहे अशी माहिती बंगळूरू पोलिसांनी दिली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments