खूप काही

काय? हॉकी आपला राष्ट्रीय खेळ नाही ? जाणून घ्या काय आहे सत्य!

वाचक मित्रांनो लहानपणापासून आपल्याला आपला राष्ट्रीय खेळ हॉकी असल्याचे सांगितले गेले आहे पण जर तुम्हाला कोणी सांगितले की हे चूक आहे तर? विश्वास बसेल का ? पण हे सत्य आहे की हॉकी आपला राष्ट्रीय खेळ नाही आहे.
खेळ एवं युवा प्रकरण मंत्रालयाने एक खळबळजनक खुलासा केला आहे आणि या खुलास्यात हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसल्याचे सांगण्यात आले आहे. मंत्रालयाकडून एवढा मोठा खुलासा करण्याचं कारण काय?  (Hockey is not our national game.)

त्याच झालं असं की, उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एक शिक्षक, मयुरेश अगरवाल जे व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल, सिंदखेड येथे शिकवतात. यांना त्यांच्याच एका विद्यार्थ्याने हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असल्याचे कधी जाहीर करण्यात आले? असा प्रश्न केला, या प्रश्नाचे उत्तर कुठेही न मिळाल्याने मयुरेश अगरवाल यांनी RTI अंतर्गत हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असल्याचे कधी जाहीर करण्यात आले ?या प्रश्नाचं उत्तर मागणारी याचिका दाखल केली.

15 जानेवारी 2020 ला मयुरेश अगरवाल यांना आपल्या प्रश्नच उत्तर एका पात्र मार्फत खेळ एवं युवा प्रकरण मंत्रालयाकडून मिळाले. या पात्रात असे नमूद करण्यात आले होते की,
‘सरकारने कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित केलेले नाही. कारण सर्व प्रसिद्ध खेळांना सामान प्रोत्साहन देणं हेच सरकारचे उद्दिष्ट आहे.’

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments