फेमस

माझे पप्पा SIX कसा मारतात, चक्क रोहित शर्माच्या चिमुकलीने घेतला अनुभव…

रोहित शर्मा षटकार कसा मारतो? याचे सर्वात अचूक उत्तर त्याची मुलगी अमायरा हिने दिले.

रोहित शर्माची मुलगी अमायरा आता थोडी मोठी झाली आहे. ती आता बोलायला लागली असून तीने अनेक गोष्टी आणि विशेषत: क्रिकेट आणि त्यामध्ये खेळल्या जाणार्‍या शॉट्सबद्दल चांगली माहिती मिळवली आहे. आम्ही हे फक्त सांगतच नाही तर मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझीच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर ते स्पष्ट दिसूनही येते आणि जर आपणही हा व्हिडिओ पाहिला तर आपलेही मत तेच असेल .

रोहित शर्माची मुलगी अमायरा हीचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल झाला आहे. ट्विटर वर तर ट्रेंडिंग ला झळकतोय .त्यात रोहित शर्माची पत्नी रितिका हिने सजह अमायराला विचारले की ,डॅडी सिक्स कसा मारतो ? तर त्यावर तिने उत्तर दिले नाही परंतु मिनी पुल शॉटद्वारे धडाकेबाज उत्तर दिले.

व्हिडिओमध्ये अमायरा मुंबई इंडियन्सच्या हेल्मेट घातलेली दिसून येते. हे हेल्मेट तीच्या वडिलांनी म्हणजे रोहित शर्मा यांनी परिधान केले आहे. हेल्मेट परिधान केल्यावर रोहित म्हणाला की ही विकेटकीपर सॅमी सारखी दिसतेय . यावर रितिका तातडीने म्हणाली की वृषभ काका म्हणजे वृषभ पंत सारखी दिसत आहे.

IPL 2021 च्या पहिल्या सामन्यात रोहितचा सामना विराटशी होईल

रोहित शर्मा सध्या क्वारंटाईनमध्ये आहे.क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर तो आयपीएल 2021 चा सराव करण्यासाठी जाईल.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आयपीएल (IPL)2021 चा पहिला सामना खेळायचा आहे. या सामन्यात मुंबईचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB)शी होणार आहे. रोहित हा आयपीएल(IPL)चा सर्वात यशस्वी कर्णधार तर मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने सर्वाधिक 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. आणि या वेळी ही टीम चे लक्ष हे विजेतेपदाचा किताब जिंकण्याकडे असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments