खूप काही

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी उरला फक्त एक दिवस, अन्यथा पॅन कार्ड होणार बंद

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यास 1 एप्रिल पासून पॅनकार्ड चालू ठेवण्यासाठी भरावा लागणार 100 रुपये दंड

आधार कार्ड व पॅन कार्ड सध्याच्या जीवनात अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेकदा या दोन्ही कार्डची आपल्याला गरज भासते. 31 मार्चपर्यंत पॅन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड बंद होणार आहे. त्यानंतर आधार कार्ड लिंक करायचे असल्यास एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारने पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी अनेकदा डेडलाईन वाढवली होती. त्यामुळे आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले नाही तर पॅन कार्ड बंद करण्यात येणार असून ते चालू ठेवण्यासाठी दंड भरावा लागणार, त्यामुळे आधारकार्ड लिंक ना केल्यास दंडाला सामोरे जावे लागणार आहे.(pan card link to aadhar card)

आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने देखील लिंक करता येऊ शकते. त्यासाठी www.incometaxindiaenfiling.gov.in या सरकारच्या वेबसाईट वरून आधारकार्ड लिंक करण्याच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म समोर येईल. त्यावर पॅन कार्ड आधार कार्ड नंबर टाकावा लागेल व त्यानंतर आपली काही व्यक्तिगत माहिती देखील भरावी लागेल. त्यानंतर एक ओटीपी येईल तो ओटीपी भरल्यानंतर आधार असा पर्याय समोर दिसेल त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक होईल.

जर मोबाईलच्या माध्यमातून लिंक करायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर UIDPAN <12 -digit Aadhar><10 digit PAN> टाईप करा आणि 567678 किंवा 561561 या नंबर वर एसएमएस पाठवा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments