खूप काही

COVID-19 Vaccination: कोविडची लस घेण्यासाठी कसे आणि कुठे करायची नोंदणी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

आजपासून संपूर्ण देशात 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी कोविड लसीकरण मोहिमेची सुरूवात करण्यात आली आहे. या टप्प्याची सुरूवात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिल्ली येथील एम्स (AIIMS) रुग्णालयात कोविडची लस घेत केली आहे. त्यांनी यावेळी सर्वांना ही लस घेण्याचे आवाहन देखील केले आहे. आज आम्ही तुम्हाला कोविड लस घेण्यासाठी काय करावे लागणार आहे याची माहिती देणार आहोत. केंद्राच्या को-विन (Co-WIN) पोर्टलवर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागणार आहे.

नोंदणी कशी करायची?

लसीकरणासाठी आपल्या नावाची नोंदणी कधीही आणि कुठेही तुम्ही करू शकता. आरोग्य सेतू ॲप किंवा www.cowin.gov.in या पोर्टलवर तुम्ही नोंदणी करू शकता. तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकाद्वारे Co-WIN 2.0 पोर्टलवर नोंदणी करायची आहे. आज 1 मार्च रोजी सकाळी 9 वाजता नोंदणी प्रक्रियेची सुरूवात करण्यात आली आहे.

कोणते कागदपत्र आवश्यक?

नोंदणी करतेवेळी तुम्हाला तुमचे नाव, जन्म तारीख, ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी झाल्याचा मेसेज येईल.

लसीकरणासाठी खर्च किती?

केंद्र सरकारने सांगितल्यानुसार सर्व शासकीय रुग्णालयात लस मोफत दिली जाणार आहे. मात्र, खासगी रुग्णालयात प्रती डोस 250 रूपये शुल्क आकारला जाणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments