आपलं शहर

मालमत्ताधारकांनी लवकर थकबाकी भरा नाहीतर मुंबई महापालिका दंड वसुलीच्या मार्गावर….

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मालमत्ता कराच्या जास्तीत जास्त वसुलीवर महापालिकेचा भर आहे पण,प्रत्येक वेळेस सूचना करूनही काही मालमत्ताधारक थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.

त्यामुळे अशा अनेक मालमत्ताधारकांना मुंबई महपालिकेकडून ८ एप्रिल २०२१ पर्यंत थकबाकी भरण्याची मुदत देण्यात आली आहे.जर असे नाही केल्यास ९ एप्रिलपासून मालमत्ताधारकांकडून अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे.

आर्थिक बाजू ही कमकुवत :
उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला अनेक कर रद्द करण्यात आल्यानंतर महापालिकेची आर्थिक बाजू ही आत्ता कमकुवत झालेले दिसून येते.ही तूट मालमत्ता आत्ता कराच्या माध्यमातून भरून काढण्यासाठी पालिकेने खूप वेगवेगळे प्रयत्न केले.तरीही, मालमत्ता कर भरण्यासाठीचे आवाहन करूनही नागरिकांकडून कोणताही चांगला प्रतिसाद मिळाला नाही,त्यामुळे महापालिकेने याबाबतची कठोर पावले उचलली आहेत.

३,१७९ मालमत्तांवर जप्तीची कारवाई :
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये ३३९२ मालमत्तांना कारवाईचा बडगा दाखविण्यात आला आहे. पण यामधील एक हजार ३७६ कोटी रुपये कर थकविणाऱ्या ३,१७९ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आठवडाभरातच सुमारे साडेतीनशे कोटी रुपये पालिकेकडे जमा झाले होते.

२० हजार कोटींची थकबाकी :मात्र अद्याप मालमत्ता कराची २० हजार कोटींची थकबाकी आहे.यापैकी किमान दहा टक्के वसूल केले तरी दोन हजार कोटी रुपये पालिकेकडे जमा होतील. मालमत्ता कराचे लक्ष्य चुकणार असल्याने महापालिकेने त्यात सुधारणा करत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४५०० कोटी वसूल करण्याचे ठरवले आहे. यापैकी आतापर्यंत केवळ दोन हजार ८७ कोटी रुपये वसूल झाले आहेत.

यामुळे ८ एप्रिलपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास संबंधित मालमत्ताधारकाला त्याअंतर्गत दंड भरावा लागेल, असा इशारा पालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याने दिला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता
मालमत्ताधारक – चार लाख ५० हजार
निवासी – एक लाख २७ हजार
व्यावसायिक – ६७ हजारांपेक्षा अधिक
औद्योगिक – सहा हजार
भूभाग आणि इतर – १२ हजार १५६

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments