खूप काही

No Smoking Day : सिगरेट सोडायची आहे, या गोष्टी तुम्हाला फायद्याच्या ठरतील

आज देशभरात नो स्मोकिंग डे (No Smoking Day) साजरा केला जात आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ना स्मोकिंग डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे जे लोक धुम्रपान करतात त्यांच्यात जागरूकता निर्माण करून सिगारेट सोडण्यास प्रवृत्त करणे. WHO नुसार संपूर्ण जगात 70 लाख लोकांचा धुम्रपान केल्याने मृत्यू होतो. 2019च्या आकड्यांनुसार भारतात जवळपास 35 टक्के लोकं धुम्रपान करतात.

धुम्रपान करणाऱ्या व्यक्तिला जसा सिगारेट पिण्याचा त्रास होतो तसाच त्रास त्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना देखील होतो. धुम्रपान केल्याने हार्ट अटॅक, कॅन्सर सहित अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच धुम्रपान केल्याने तुमच्या संपूर्ण शरिरावर त्याचा साईड इफेक्ट होतो.

अशी सोडवा सिगारेटची सवय
सिगारेट पिण्याची सवय सोडणे तसे कठिण आहे. परंतू, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आणि योग्य प्लॅन तयार करून तुम्ही सिगारेट पिण्याची सवय सोडवू शकता. सिगारेट पिण्याची सवय सोडण्यासाठी तुम्हाला सुरूवातीला थोडा त्रास होईल. मात्र तो त्रास पुढील काळात सिगारेट सुटल्यावर तुमच्या शरिरासाठी फायद्याचा ठरेल.

क्रेविंग असेल तर लक्ष दुसरीकडे वळवा
कोणत्याही गोष्टीची सवय काही काळासाठी असते. यादरम्यान तुम्ही तुमचे लक्ष अन्य गोष्टींकडे वळवा. जर तुम्ही स्वत:ला त्यादरम्यान कंट्रोलमध्ये ठेवलं तर ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

ट्रिगर पॉईटपासून दूर रहा
अनेकांना चहा-कॉफी आणि दारुसोबत सिगारेट पिण्याची सवय असते. या कारणांनाच ट्रिगर म्हणतात. या वस्तूंपासून वाचण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही एखाद्या पार्टीत जात असाल आणि तिथे तुमचे मित्र सिगारेट पिणार असतील तर तिथे जाण्यापासून स्वत:ला थांबवा. काही काळ त्या मित्रांपासून दूर राहणेच पसंत करा. यामुळे तुम्हाला सिगारेट सोडण्यासाठी मदत मिळेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments