खूप काही

हिरेन मृत्यू प्रकरणातील थरारक माहिती समोर, इतका मास्टर प्लॅन कोणाचा?

ठाणे येथील रहिवासी असलेल्या 46 वर्षीय मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करीत असताना एक मोठा आणि धक्कादायक खुलासा झालेला आहे. हिरेन यांचा मृतदेह रेतीबंदर जवळील कळवा खाडीत सापडला होता. सुरुवातीला या तपासाने आत्महत्ये कडे लक्ष वेधले होते परंतु एटीएसच्या तपासा वरून ही आत्महत्या नसल्याची शंका निर्माण झाली आहे.

तपास करताना पोलिसांना मास्क सापडला. आत्महत्या करणारी एखादी व्यक्ती covid-19 पासून वाचण्यासाठी मास्क का लावेल? त्यामुळे हिरेन यांची हत्याच झाली असावी असा संशय आहे.

मनसुख हिरेन यांच्या तोंडात रुमाल ठेवला होता. पोलिसांना अशी शंका आहे की शरीरात पाणी जाऊ नये आणि शरीर पाण्यावर तरंगताना कोणाला दिसू नये म्हणून त्यांच्या तोंडात रुमाल ठेवला असावा जेणेकरून पोलीस आणि कुटुंब मनसुख यांच्या शोध कार्यात व्यस्त राहतील आणि त्या वेळात मारेकरी पुरावे नष्ट करून पळून जातील. त्याचबरोबर एटीएस च्या हाती रुमाल आणि एक व्हिडिओ देखील लागला आहे. ( mansukh hiren )

मनसुख हिरेन हे दोन फोन वापरत असल्याने हे दोन्ही फोन मृत्यूआधी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चालू बंद करण्यात आले होते. एकाचे शेवटचे ठिकाण वसई होते तर दुसऱ्या फोनचे ठिकाण तुंगारेश्वर येथील होते. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मारेकर्‍यांनी पोलिसांना शोधात व्यस्त ठेवण्यासाठी दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून फोन चालू बंद केला असावा.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह जेव्हा पाण्यात फेकला गेला तेव्हा भरतीची वेळ असती तर मृतदेह पाण्यात भरतीसह वाहून दुसरीकडे गेला असता आणि पोलीस मनसुख हिरेन यांच्या शोधात राहिले असते. परंतु मनसुख यांच्या मास्कच्या आत तोंडामध्ये जो रुमाल होता तो ओला न होता सुखाच आढळला. मृतदेह फेकला त्या वेळी ओहोटीचा समय असल्याने मृतदेह जास्त लांब वाहत न जाता तिथेच गाळात रुतून राहिला असावा त्यामुळे मृतदेह वर आला नाही.

असा निष्कर्ष एटीएस अधिकाऱ्यांनी काढला. तसेच मनसुख हिरेन यांचा खून करून त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर मध्ये फेकून देण्यात आला असावा. हिरेन बेपत्ता झाले त्या रात्री तीस मिनिटांच्या अंतरावर त्यांचा फोन चालू आणि बंद करण्यात आले होते जेणेकरून त्याच भागांमध्ये पोलीस मनसुख यांचा शोध घेत राहतील. असा संशय देखील एटीएस अधिकाऱ्यांना आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments