खूप काही

IND VS ENG : अहमदाबाद मध्ये उद्यापासून रंगणार T२० चे सामने, ही असू शकते भारताची प्लेयिंग ११ खेळी !

भारत आणि इंग्लंड मध्ये पाच मॅचेस चा T20 सामना उद्या संध्याकाळी 7:00 वाजल्यापासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघाने इंग्लंडला टेस्ट मॅच मध्ये 3-1 ने पराभूत केले होते, आणि आता भारतीय संघाचं लक्ष पाच मॅचेस चा T20 सामना जिंकणे हेच आहे. या मॅचसाठी भारतीय संघाने खूप मेहनत घेतली आहे सोबतच एक शानदार अशी रणनीती सुद्धा बनवली आहे. त्यानुसार ही असू शकते भारताची इंग्लंड विरुद्ध भारताची प्लेयिंग 11 खेळी.  (IND VS ENG T20 match )

 

रोहित शर्मा 

नुकत्याच संपलेल्या टेस्ट मॅच मध्ये रोहित शर्माने भारतासाठी सर्वाधिक असे 345 रन बनवले होते. आता या T20 सामन्यासाठी सुद्धा रोहित आणि त्याची बॅट कंबर कसून तयार आहेत. 

शिखर धवन 

पहिल्या T20 मॅच मध्ये शिखर धवन रोहित शर्माच्या जोडीदाराच्या रूपात दिसू शकतो. शिखर धवन T२० मध्ये जास्तीत जास्त रन बनवण्यात माहीर आहे.

विराट कोहली 

पहिल्या T20 मॅच मध्ये भारतीय संघाचे कर्णधार विराट कोहली नंबर तीन वर बॅटिंग करताना दिसेल. टेस्ट मॅच मध्ये कोहलीचे प्रदर्शन चांगले नव्हते म्हणून या मॅच मध्ये विराट जोरदार खेळी खेळण्यासाठी खूपच उत्सुक आहे. 

के एल राहुल 

नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी के एल राहुलला उतरवण्यात येऊ शकते. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर ला संघा बाहेर जाव लागण्याची शक्यता आहे. 

रिषभ पंत 

इंग्लंड विरुद्ध चौथ्या टेस्ट मॅच मध्ये रिषभ पंत च्या शतकामुळे भारताने मॅच आणि सिरीज दोन्ही जिंकले होते.

याचमुळे रिषभ पंत विकेटकिपिंग सोबत नंबर 5 वर खेळताना दिसेल. 

हार्दिक पांड्या 

या मॅच साठी हार्दिक पांड्या नंबर 6 वर खेळताना आणि ऑलराऊंडर च्या भूमिकेत सज्ज राहील. 

वॉशिंगटन सुंदर  

हार्दिक पांड्या सोबतच ऑलराऊंडर च्या भूमिकेत वॉशिंगटन सुंदर दिसणार आहे सोबतच तो नंबर 7 वर बॅटिंग सुद्धा करेल. 

युजवेंद्र चहल 

या सामन्यात युजवेंद्र चहल स्पिन डिपार्टमेंट सांभाळणार आहे. त्याच्या समोर इंग्लंड चा निभाव लागणे कठीणच आहे. 

भुवनेश्वर कुमार 

पेस बॉलिंग अटॅक ची कमान भुवनेश्वर कुमार सांभाळणार आहे. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत गोलंदाजीचं शिवधनुष्य भुवनेश्वर कुमार उचलणार आहे. 

शार्दूल ठाकूर 

शार्दूल ठाकूर भुवनेश्वर कुमारला गोलंदाजीत साथ देताना दिसणार आहे. शार्दूल गोलंदाजी सोबतच वेळप्रसंगी रन सुद्धा घेऊ शकतो. 

दीपक चाहर 

दीपक चाहर तिसऱ्या गोलंदाजाच्या रूपात दिसणार आहे. दीपक चाहर ने ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सिरीज मध्ये चांगल प्रदर्शन केलं होत. 

  

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments