खूप काही

IND vs ENG: टी-20 सिरिजआधी भारताला झटका; ‘हा’ खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये झाला फेल

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत विजय संपादित केल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेकडे लक्षकेंद्रीत करत आहे. मात्र सामन्याच्या आधीच भारतीय संघाला जोरदार झटका लागला आहे. भारताचा लेग स्पिनर वरूण चक्रवर्ती हा फिटनेस टेस्टमध्ये नापास झाला आहे. या कारणामुळे वरूणला आता इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळता येणार नाही.

वरूण चक्रवर्ती बंगळूरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी (NCA) मध्ये लगातार फिटनेस टेस्ट पास करण्यास अयशस्वी राहिला आहे. BCCI मधील एका वरिष्ठ सूत्रानूसार, “वरूण चक्रवर्तीची यासाठी निवड करण्यात आली होती कारण तो खांद्याच्या दुखापतीमधून सावरत होता. त्याने NCA मध्ये रिहॅबीलेटेशन पूर्ण केलं होतं. परंतू तो जवळपास दोन वेळा यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) मध्ये अयशस्वी ठरला, ज्यामध्ये त्याला दोन किलोमीटर धावायचे होते.”

वरूण चक्रवर्तीने गेल्या पाच महिन्यात एकही सामना खेळला नाही आहे. अशा परिस्थितीत चक्रवतीची त्याच्या पाच महिने आधीच्या सामन्यातील गोलंदाजीवर निवड होऊ शकत नाही, अशी माहिती BCCI मधील वरिष्ठ सूत्राने दिली आहे.

टी-20 मालिकेसाठी राहूल चहर भारतीय संघात सामिल होणार आहे अशी माहिती मिळाली आहे. तसेच नटराजनच्या फिटनेसवर NCA मधील मेडीकल स्टाफ लक्ष ठेऊन आहेत. नटराजन फिट असल्यास कमीतकमी मालिकेतील दुसऱ्या सत्रात खेळण्याची संधी त्याला मिळू शकते.

भारत वि. इंग्लंड टी-20 मालिकेला, शुक्रवार 12 मार्चपासून सूरूवात होणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments