खूप काही

नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात, 1 एप्रिलपासून या गोष्टींच्या किंमती वाढणार…

1 एप्रिलपासून सर्वसामान्यांना महागाईचा तडखा

1 एप्रिलपासून महागाई वाढणार. दूध, वीज, टी व्ही खूप काही होणार महाग. AC , फ्रिजच्या कंपन्या त्यांच्या किंमतीत वाढ करणार आहेत. AC बनवणाऱ्या कंपन्या 4-5% वाढ करण्याची योजना तयार करत आहेत. म्हणजे प्रति युनिट एसीच्या किंमतीमध्ये 1500 रुपये ते 2000 रुपये इतकी वाढ होऊ शकते.

कार, बाइकच्या किंमतीतही होणार वाढ. मारुती, निसान यांसारख्या कंपन्यांनी देखील किंमतीत वाढ करायचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून या कंपन्यांच्या कारची किंमत देखील वाढणार आहे. परंतु त्यांची किंमत किती रुपयांनी वाढणार आहे हे अजून तरी ऑटो कंपनीने सांगितलेले नाही.(Inflation will rise from 1 April )

एक एप्रिलपासून टीव्हीच्या किंमती देखील वाढणार आहेत. 8 महिन्यांमध्ये टीव्हीची किंमत तीन ते चार हजार रुपये इतकी वाढली आहे. 1 तारखेपासून टीव्ही च्या किंमतीमध्ये कमीत कमी दोन ते तीन हजार रुपयांची वाढ होणार आहे.

त्याचबरोबर दुधाच्या किंमतीत देखील वाढ होऊ शकते. दुधाच्या किंमतीत तीन रुपयाची वाढ करून 49 रुपये प्रति लिटर दूध होऊ शकते. दुधाचे नवीन दर एक एप्रिल पासून लागू होतील. दुधाच्या किंमतीत वाढ झाल्यास तूप, पनीर, ताक अशा अनेक दुधापासून बनणाऱ्या उत्पादनात देखील वाढ होईल.

विजेच्या दरात देखील वाढ होऊ शकते. एक एप्रिलपासून विजेचे जास्तीचे बिल भरावे लागणार. पॉवर डिस्ट्रीब्यूशन कंपनी विजेच्या दरात 10% वाढ करू शकते असे सांगण्यात आले आहे. परंतु विजेच्या बिलात वाढ होणार हे अजून नक्की नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments