खूप काही

IPL 2021: क्रिकेट चाहत्यांना IPL 2021 मोफत पाहण्याची संधी; जाणून घ्या एअरटेलची नवीन ऑफर

BCCI ने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक आज जारी केले आहे. 9 एप्रिल रोजी चेन्नई येथे आयपीएल 2021ची सुरूवात होत आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना 30 मे 2021 रोजी संपन्न होणार आहे. आयपीएल 2021 ची सूरूवात चेन्नई येथे मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंग्लोर यांच्यातील सामन्याने होणार आहे.

अशातच काही चाहते आपल्या स्मार्टफोनवर सामन्यांचे लाईव टेलिकास्ट पाहणे पसंत करतात. या चाहत्यांसाठी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी विशेष प्लॅन आणले आहेत. या विशेष प्लॅनद्वारे आयपीएल 2021चे सर्व सामने चाहत्यांना पाहता येणार आहेत. एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी 400 ते 2698 पर्यंतचे विशेष प्लॅन घोषित केले आहेत.

1. 401 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी दररोज 3GB डेटा मिळणार आहे. तसेच डिसने प्लस हॉटस्टार व्हिआयपीचे एक वर्षासाठीचे सब्सक्रिपशन मिळणार आहे.

2. 448 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी दररोज 3GB डेटा मिळणार आहे. त्याप्रमाणे डिसने प्लस हॉटस्टार व्हिआयपीचे एक वर्षासाठीचे सब्सक्रिपशन मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड वॉईस कॉल, आणि दररोज 100 एसएमएस ची सुविधा मिळणार आहे.

3. 599 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांसाठी दररोज 2GB मिळणार आहे. त्याप्रमाणे डिसने प्लस हॉटस्टार व्हिआयपीचे एक वर्षासाठीचे सब्सक्रिपशन मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड वॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस ची सुविधा मिळणार आहे.

4. 2698 रुपयांचा प्लॅन
या ऑफर मधील शेवटचा आणि एअरटेलचा सर्वात महागडा प्लॅन आहे 2698 रुपये किंमतीचा हा प्लॅन. यामध्ये तुम्हाला 356 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळणार आहे. त्याप्रमाणे डिसने प्लस हॉटस्टार व्हिआयपीचे एक वर्षासाठीचे सब्सक्रिपशन मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड वॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस ची सुविधा मिळणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments