फेमस

IPL 2021 : न्यू पॉवर, न्यू जर्सी आणि न्यू जोष, मुंबईकर IPL च्या मैदानात…

आयपीएलचा पहिलाच सामना मुंबई विरुद्ध आरसीबी यांच्यात चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणार आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. या दिवशी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबी (RCB) टीमशी होणार आहे. आयपीएलचा पहिलाच सामना चेन्नईच्या (Chennai) चेपॉक मैदानावर (Chepauk Ground) होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका संपल्यानंतर (IND vs ENG) टीम इंडियाच्या (Team India) क्रिकेटपटूंनी आयपीएल 2021 ची तयारी सुरू केली आहे. ‘हिटमन’ रोहित शर्माही (Rohit Sharma) आयपीएलमध्ये आपली कामगिरी दाखवण्यासाठी सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे. (IPL 2021: New Power, New Jersey and New Josh, Mumbai Indians at the IPL ground)

रोहित शर्माची मुंबईकडे कूच
येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलची सुरुवात होत आहे, त्यापुर्वी आपली आंतराष्ट्रीय कामगिरी सोडून रोहित शर्मा आपल्या मुंबईच्या टीमकडे वळला आहे. रोहित शर्माने सोमवारी मुंबई इंडियन्स संघात दाखल झाल्याची पोस्ट शेअर केली आहे. हिटमॅनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत आपण मुंबई इंडियन्सच्या संघात आल्याचे संकेत दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)


हे 3 खेळाडूही पोहोचले मुंबईत
रोहित शर्माच्या पाठोपाठ हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनीदेखील संघात हजेरी लावली आहे. सोमवारी मुंबई इंडियन्सच्या संघात ते दाखल झाले आहेत. या मुंबई इंडियन्सने स्वत: यासंबंधित व्हिडीओ शेअर करत, या तिघांचे संघात स्वागत केले आहे.

न्यू जर्सीमध्ये झळकणार मुंबई टीम
आयपीएल 2020 चा विजेती टीम मुंबई इंडियन्स न्यू जर्सीमध्ये दिसणार आहे, यंदाच्या 14 व्या मोसमात विजय मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स पूर्णपणे प्रयत्न करणार आहे, मात्र त्यांचा ‘न्यू जर्सीमधील कूल लूकही एकद भन्नाट आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश अशा 5 घटकांचं मिश्रण म्हणजे मुंबईची जर्सी असल्याचं म्हटलं जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments