फेमस

IPL 2021 : मुंबई इंडियन्ससह दिल्ली संघाच्या अडचणीत वाढ; पहिल्या सामना दिग्गजांशिवाय…

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) सीजनच्या तयारींना जोरात सुरूवात झालेली आहे.भारतीय टीमचे सगळे आंतरराष्ट्रीय मॅच संपले आहेत आणि टीमचे सगळे स्टार खेळाडू आपल्या आपल्या फ्रेंचाइजी सोबत जोडले गेलेले आहेत.ट्रेनिंगसुद्धा चालू झालेली आहे आणि आयपीएल सीजन चालू व्हायला 10 दिवस बाकी आहेत. या सगळ्यात 4 टीमच्या समस्या वाढल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणाऱ्या वन डे सिरीजमुळे काही खेळाडू (players) आयपीएलचा भाग होऊ शकणार नाही.या सिरीजसाठी आफ्रिकी टीममध्ये क्विंटन डि कॉक (MI), कगिसो रबाडा (DC), एनरिक नॉर्खिया (DC), डेविड मिलर (RR) और लुंगी एनगिडी (CSK) हे खेळाडू आहेत.या मुळे हे खेळाडू फ्रेंचाइजीमध्ये खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या मधील 3 मॅचची सुरुवात 2 एप्रिल पासून होणारे.पहिली मॅच 2, दुसरी मॅच 4 आणि शेवटची मॅच 7 तारखेला खेळली जाणार आहे.दक्षिण आफ्रिकेने सिरीज नंतर खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे.तरी सुद्धा पहिल्या काही मॅच खेळणं या खेळडूंनी खेळाडूंसाठी कठीण आहे आणि त्याच कारण आहे एक आठवड्याचा क्वारंटीन (quarantine). सगळ्या खेळाडूंना बायो-बबलमध्ये येण्याच्या आत अनिवार्य क्वारंटीनमध्ये राहावं लागेल. 

बीसीसीआयने खेळाडूंच्या बायो-बबलसह फ्रेंचायझीच्या बायो-बबलमध्ये थेट प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत, पाचही फ्रॅन्चायझींनी एकत्रितपणे या खेळाडूंना चार्टर्ड फ्लाइटद्वारे बोलवल्यास ते आयपीएलच्या बायो-बबलचा थेट भाग होऊ शकतील आणि सुरुवातीपासूनच संघासाठी उपलब्ध असतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments