खूप काही

IPL 2021: ठरलं! या दिवशी वाजणार IPL 2021 चे बिगूल…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज इंडियन प्रिमियर लिग (Indian Premier League) या स्पर्धेच्या चौदाव्या पर्वाची घोषणा केली आहे. BCCI ने एक पत्रक काढत याची माहिती दिली आहे. IPL 2021 ची तारीखदेखील यामध्ये नमूद करण्यात आली आहे. 9 एप्रिल पासून आयपीएल 2021 ची सूरूवात होणार आहे. तर अंतिम सामना 30 मे 2021 रोजी संपन्न होणार आहे.

आयपीएल 2021 ची सूरूवात चेन्नई येथे मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंग्लोर यांच्यातील सामन्याने होणार आहे. तसेच लिग सामन्यातील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंग्लोर वि. पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादेत होणार आहे. अर्थात यामध्येही त्यावेळची कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेत सामन्यांच्या तारखा आणि ठिकाण ठरविण्यात येईल.

सहा ठिकाणी सामन्यांचे आयोजन

आयपीएलचे 2021चे सर्व सामने एकूण सहा ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. अहमदाबाद, बंगळूरू, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता आणि दिल्ली याठिकाणी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून या सामन्यांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती IPL Governing Council ने दिली आहे.

लिग स्टेजमधील सर्व सामने 4 ठिकाणी खेळविण्यात येणार आहेत. एकूण 56 लिग सामन्यांतील चेन्नई, मुंबई, बंगळूरू आणि कोलकत्ता येथे प्रत्येकी 10 सामने खेळविण्यात येणार आहेत. तर दिल्ली आणि अहमदाबाद येथे प्रत्येकी 8 सामने खेळविण्यात येणार आहेत. तसेच यंदाच्या पर्वात कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळू शकणार नाहीत.

दरम्यान, आयपीएल 2021 च्या तारखांची घोषणा झाल्यामुळे क्रिकेट चाहते आता प्रचंड उत्सूक आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments