आपलं शहर

IPL 2021: मुंबई इंडियन्सला हरवण कठीण आहे, सुनील गावसकर

Mumbai IPL 2021: भारत आणि इंग्लंड (India Vs England) यांच्यातील एकदिवसीय मालिका पार पडल्यानंतर क्रिकेट रसिकांना आता आयपीएलचे (IPL 2021) वेध लागले आहेत.येत्या 9 एप्रिल पासून आयपीएल चालू होणार आहे.पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु( Royals Challengers Bangalore) यांच्यात आहे.ही मॅच चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळवली जाणार आहे.

भारताचे महान खेळाडू सुनील गावसकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.मुंबईला हरवणं इतर संघासाठी मोठी कठीण गोष्ट असेल, असं वक्तव्य गावस्कर यांनी केलं आहे.सुनील गावसकर “या हंगामात मुंबईला हरवणं इतर संघांसाठी मोठी कठीण गोष्ट असेल. मुंबईच्या खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता खरंच मुंबईला हरवणं प्रतिस्पर्ध्यांना वाटतं तेवढं सोपं नाहीय. इशान किशन, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या अशा एकापेक्षा एक खेळाडूंचा मुंबईच्या संघामध्ये भरणा आहे. त्यामुळे मुंबईला हरवणं कठीण आहे.”

हार्दिक पांड्याने गोलंदाजी (bowling) करण्याची गरज आहे मग ते मुंबई साठी असो वा भारतासाठी. इंडियन प्रीमियर लीग (IPL) अर्थात आयपीएलच्या पाठीमागील हंगामातील विजेता संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 14 व्या हंगामासाठी नवी जर्सी लाँच केली आहे. ब्रह्माण्डातील पाच मूलतत्व पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे या जर्सीवर दाखवण्यात आले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments